Advertisement

अम्मा दर्गा गाडेघाट येथे तीन दिवसीय वार्षिक उर्स मुबारक ची सुरुवात

अम्मा दर्गा गाडेघाट येथे तीन दिवसीय वार्षिक उर्स मुबारक ची सुरुवात

आज अम्मा दर्गा येथुन निघणार शाही संदल

कन्हान  – हुजूर मरियम अम्मा साहेबा गाडेघाट , जुनी कामठी ता.पारशिवनी येथील वार्षिक उर्स मुबारक ची बुधवार (दि.१७) ला सुरुवात करून तीन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे .

नागपुर जिल्हयातील गाडेघाट , जुनीकामठी ता.पारशिवनी येथील प्रसिध्द अम्मा दर्गा येथे हुजूर अम्मा साहेबा (र.अ.) तीन दिवसीय उर्स मुबारक ची सुरूवात बुधवार (दि.१७) मई २०२३ ला सुरुवात करून रात्री ९ वाजता मिलाद शरीफ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . आज गुरूवार (दि.१८) मई ला दुपारी १ वाजता अम्मा दर्गा येथुन शाही संदल शरीफ काढुन कन्हान रेल्वे स्टेशन परिसरात हजरत बाबा ताजुद्दीन औलिया (र.अ.)ताज बाग नागपुर येथुन आलेल्या शाही संदल चे मिलाप होऊन गहुहिवरा चौक ते तारसा रोड चौक भ्रमण करित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन ते गाडेघाट अम्मा दर्गा येथे पोहचुन गस्त घालतील .

सायंकाळी ६ वाजता परचम कुशाई नंतर चादर चढवुन रात्री ८ वाजता कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . उद्या शुक्रवार (दि.१९) मई २०२३ ला सकाळी ९ वाजता कुल शरीफ ने उर्स मुबारक ची सांगता करण्यात येईल . या तीन दिवसीय कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी , भाविकांनी उपस्थित राहुन वार्षिक उर्स चा लाभ घ्यावा असे कडकडीचे आवाहन सज्जादानशीन तब्रेजुद्दीन , सज्जादानशीन ताजी तनवीरूद्दीन व ताजी मुस्तफीजुद्दीन यांनी केले आहे .

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या