दुचाकी चालकास वाचविण्यास कटेंनर ट्रक ला ट्रक ची मागुन जोरदार धडक, दोघे जख्मी
ट्रक चे मोठे नुकसान, दुचाकी वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी बायपास महामार्गाच्या तारसा रेल्वे पटरीच्या उडाणपुलावर दुचाकी वाहन चालकास वाचविण्याकरिता एकाएक कंटेनर चालकाने जागीच गाडी थांबविल्याने मागुन येणाऱ्या टाटा दहा चाकी ट्रक ने कँनटेनेरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहना चालक व ट्रक क्लीनर जख्मी झाला असुन ट्रक चे ३० ते ३५ हजार रुपयाचे नुकसान झाले.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार (दि.२४) मे ला १२.३० वाजता दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग बायपास वरील नागपुर हावडा रेल्वे पटरीच्या उडाणपुलावर राष्ट्रीय महामार्ग पोलीस हे वाहना ला थांबवुन तपासणी करित असल्याने बजाज डिस्कव्हर दुचाकी वाहन क्र.एम एच ४० एम – ३१५१ चा चालक पोलीसांच्या भितीने कांद्री टोल नाका कडुन विरूध्द दिसेने जात असतांना अशोक लेलैंड ६ टायर कंटेनर ट्रक क्र. एमएच ३१ डी.क्यु ३२४६ चा चालक अनिल दत्तु फौड वय ३५ वर्ष रा.नखाते वस्ती सटनी, ता. हवेली, जिल्हा पुणे हा पुणे येथुन जनरल पार्सल घेवुन वाराणाशी (यु.पी) येथे जातांना दुपारी १२ वाजता दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग बायपास वरील नागपुर हावडा रेल्वे पटरीच्या उडाण पुलावर विरुध्द दिशेने एक इसम बजाज डिस्कव्हर दुचाकी वेगाने अचानक ट्रक समोरासामोर आल्याने अनिल दत्तु फौड यांनी आपला ट्रक वळवला असता दुचाकी वाहन चालक हा ट्रक च्या बाजुला पडला. तसेच कंटेनर ट्रक चालकाने ब्रेक मारल्याने मागुन येणारा टाटा दहा चक्का ट्रक क्र.एम एच.४९.एटी. ३१३२ ची कंटेनर ला मागुन जोरदार धडक लागल्याने अनिल दत्तु फौड यांचा ट्रक चे मागील भागाचे अंदाजे ३० ते ३५ हजार रुप्याचे नुकसान झाले. तर क्लीनर जख्मी होऊन टाटा दहा चाकी ट्रक चे कॅबीन बैंड होवुन नुकसान झाले आहे.
सदर घटनास्थळी महामार्ग पोलीसांनी पोहचुन जख्मी दुचाकी चालकास टोल नाका च्या रूग्णवाहीका ने मेयो रूग्णालय नागपुर ला पाठवुन कन्हान पोलीसांना माहिती देताच पोलीस हवालदार प्रविण चव्हान, महेंद्र जळीतकर हे आपल्या स्टाॅप सह घटनास्थळी पोहचुन वाहतुक सुरळीत करित पंचनामा करुन
सदर प्रकरणी फिर्यादी अनिल दत्तु फौड यांचे तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी दुचाकी वाहन चालका विरुद्ध अप क्र. ३११२३ कलम २७९, ३३६, ३३७, ४२७, भादंवि सह कलम १८४, १२२ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रविण चव्हान, महेंद्र जळीतकर हे करीत आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या