११ व्या वर्धापन दिनी अंबुलगा बुद्रुक येथे वारकरी साहित्य परिषदेचे शाखा उद्घाटन सोहळा संपन्न
११ व्या वर्धापन दिनाच्या अवचित्त साधून अंबुलगा बुद्रुक येथे वारकरी साहित्य परिषदेचे शाखा उद्घाटन सोहळा संपन्न
मुखेड(अंबुलगा बुद्रुक )नांदेड:- महादेव मंदिराच्या आवार मध्ये दि.२५/०५/२०२३ रोजी वारकरी साहित्य परिषद यांचा अकराव्या वर्धापन दिनानिमित्ताने जमलेले सर्व वारकरी व भक्तगणाला उद्देशून सोहळा साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड जिल्ह्याचे माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील लाभले होते.
गोजेगावकर वारकऱ्यांमध्ये महिला वारकरी सर्वश्रेष्ठ आहेत कारण आपलं कुटुंब, लहान मुलं, समाज हे सर्व व्यवस्थित सांभाळून वारकरी संप्रदाय मध्ये वेळ देतात संस्कार योग्य प्रमाणात देऊन समाजामध्ये उंच माननीय जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणारे माझी माय माऊली आहे..! म्हणून श्रेष्ठ म्हणतो असे प्रतिपादन आलेले प्रमुख मार्गदर्शक जमलेल्या सर्व वारकऱ्यांना संबोधण्यात आले.
यामध्ये वारकरी संप्रदाय सद्भावनेमध्ये कार्यरत असलेले वारकरी साहित्य परिषदेचे प्राध्यापक विजय जोशी त्यांच्या भाषणांमधून वारकऱ्याची अवस्था काय आहे, याला जबाबदार कोण आहे..! वृद्ध वारकरी कलाकारांना गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडे कायमस्वरूपी मानधन सुरू करण्यासाठी आपण विनंती अर्ज केले असता, अध्यापही मंजूर झालेले नाही. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी हा आपण वारकरी संप्रदायाचा एक सोहळा आपण आयोजित केला आहे असे जाहीर करण्यात आले.
https://youtu.be/ergG_s1tgek
हिंदू धर्माबद्दल ज्या व्यक्तीला ज्या महिलांना ज्या नेत्यांना पूर्ण अभ्यास नाही अशा व्यक्तीने धर्मावर बोलण्याचा नैतिक अधिकार उरत नाही अशी बोचक टीका राजकारणावरती ओढत असताना दिसून येत होते, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व्यंकट गोळे यांनी प्रस्ताविक भाषणामध्ये नांदेड जिल्ह्याच्या सर्व वारकऱ्यांची पायी फिरून भेट घेऊन ह्या वारकरी कार्यक्रमाचा महत्त्व समजावून सांगण्यात आले! असे ते बोलत होते.
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पंचक्रोशी मध्ये सर्व नमाजलेले मारुती आंबेडकर यांचा पण मोलाचा मार्गदर्शन झाले प्राध्यापक विजय जोशी बिजलवाडीकर, जिल्हा महिला अध्यक्ष भारत देसाई, व्यंकट गुळवे, जिल्हाध्यक्ष धर्माजी पाटील, भाटपुरकर मुखेड तालुका अध्यक्ष, मारुती पवार खंदारकर, डॉक्टर प्रकाश पाटील झरीकर, लँग्वेज चे सरपंच संजय सूर्यवंशी, राम पाटील, उमाकांत प्रकाश पाटील, विठ्ठल गोरेगावकर, आंबुलगा नगरीचे सर्व वारकरी मंडळ आधी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधि राजेराम वाघमारे, मुखेड-नांदेड
0 टिप्पण्या