Advertisement

कर्नाटक विजयाचा कन्हान कॉग्रेस पदाधिकार्यांनी केला जलोष

कर्नाटक विजयाचा कन्हान कॉग्रेस पदाधिकार्यांनी केला जलोष

कन्हान – कर्नाटक निवडणुकीत भाजप चा दारुण पराभव झाला असुन कॉग्रेस पक्षाने भरघोस यश प्राप्त करुन विजय झाल्याने कन्हान कॉग्रेस कमेटी व्दारे जल्लोष करून आंनदोत्सव साजरा केला.

कर्नाटक मध्ये झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यश प्राप्त करुन काँग्रेस पक्ष पुन्हा सतेत आला. याचे संपुर्ण श्रेय कर्नाटकातील जनतेला व मा. राहुल गांधी यांनी दिले. लोकांच्या विश्वास आज ही काँग्रेस पक्षावर आहे. हे कर्नाटकातील जनतेने दाखऊन दिले. कर्नाटकची निवडणुकीची लढाई सरकार मधिल बड्या भांडवलदार, भ्रष्ट नेत्या विरुद्ध सुशिक्षित लोक व गरीब जनता यांच्यात होती. यात जनतेचा मताचा विजय झाला.

आम्ही ही लढाई जिंकली. द्वेष भावना विरुद्ध प्रेमाने हा लढा काँग्रेस ने जिंकला. भारत जोड़ो यात्रेची पहिली यशस्वी वाटचाल महोब्बत की दुकान कर्नाटक में शुरू कॉग्रेस चा विजय असो, अश्या घोषणा देत सौ. रिताताई नरेश बर्वे अध्यक्ष कन्हान महिला काँग्रेस व राजेश यादव अध्यक्ष काँग्रेस कमेटी कन्हान यांच्या नेतृत्वात तारसा रोड चौक कन्हान येथे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा विजयाचा उत्साहाने जल्लोष करून आंनदोत्सव साजरा करण्यात आला.

या प्रसंगी कन्हान नगर परिषद उपाध्यक्ष योगेश रंगारी, नगरसेविका कल्पना नितनवरे, सौ.सुनीता मानकर, सतीश भसारकर, आकीब सिद्धीकी, शक्ती पात्रे, प्रमोद बांते, रवी रंग, गौतम नितनवरे, शरद वाटकर, सतीश पाली, अजय कापसीकर, बागडे काका, आनंद चकोले, दिनेश नारनवरे सह बहु संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित होऊन जल्लोष साजरा केला.

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या