शिवसेना पक्ष (उद्धव ठाकरे गट) द्वारे भव्य नागरिक शिबीर संपन्न
पारशिवनी:- शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या वतीने पारशिवनी येथे भव्य नागरिक शिबीराचे आयोजन. सोमवार दिनांक 08/05/2023 रोजी शिवसेना पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, पारशिवनी येथे रामटेक विधानसभा क्षेत्राचे प्रमुख विशाल बरबटे यांच्या प्रमुख उपस्थित महाराष्ट्र दिवस व कामगार दिवसाचे औचित्य साधून पारशिवनी तालुक्यातील नागरिकांसाठी भव्य मोफत नागरिक शिबीर आयोजित केले होते.
यामध्ये ई-श्रम आयुष्यमान भारत योजना, सुकन्या योजना, मातृत्व वंदना योजना, आधार कार्ड, अपडेट पॅन कार्ड, दुर्घटना विमा, किसान विकास, महिला सम्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना, कॉलरशिप वरिष्ठ नागरिक बचत योजना या सारख्या अनके शासकीय योजनेचा लाभ पारशिवनी तालुक्यातील नागरिकांनी घेतला.
या शिबिराचे उदघाटन शिवसेना पक्षाचे रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे यांनी केले तर शिबिराला पक्षाचे नागपूर जिल्हा ग्रामिनचे सहसंपर्क उत्तमभाऊ कापसे, तालुका प्रमुख कैलास खंडार, रामटेक विधानसभा क्षेत्राचे सहसंपर्क प्रमुख सूत्तमभाऊ मस्के, युवासेना ना. ग्रा. चे प्रमुख लोकेश बावणकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख समीर मेश्राम, युवासेना तालुका प्रमुख अभिषेक एकुणकर व किशोर चौधरी, हर्षल सावरकर,प्रशान्त लकडकर, नीता गोमकाळे इत्यादी सह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्खेने कामगार बांधव व महिला मंडळी उपस्थित होते
प्रतिनिधी:- सतीश साकोरे-पारशिवनी


0 टिप्पण्या