बैंक अकाउंट मध्ये १८,००० रु ट्रान्सफर करुन युवतीची केली फसवणुक
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत खेडी गांधीनगर पोस्ट सालवा येथील रहिवासी साईदेवी कुचपुडी युवती च्या फोन पे युपीआय आईडी अॅप मधुन संशयित आरोपी देविका एम नामक युवती ने १८,००० रुपए काढुन आपल्या बैंक अकाउंट मध्ये ट्रांसफर करुन फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी साईदेवी कुचपुडी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी देविका एम विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी साईदेवी व्यंकटेश्वर कुचपुडी वय २१ वर्ष रा.खेडी गांधीनगर पोस्ट सालवा हे मार्च २०२३ पासुन फोर सिजन इंटरनेशनल हाॅटेल्स अॅंन्ड रिसोर्ट मध्ये कंपनी सेक्रेटरी ची ट्रेनिंग घेत आहे. साईदेवी कुचपुडी हिचा खाता अकाउंट युनियन बैंक शाखा कांद्री कन्हान येथे असुन अकाउंट नंबर ६६१४०२०१००१६९२३ हा आहे. साईदेवी कुचपुडी युनियन बैंक शाखा आणि अकाउंट मधुन पैशाचा व्यवहार करते. साईदेवी कुचपुडी हिच्या खात्यात १८,२१४ रुपए होते. साईदेवी हिला एखाद्याला तातडीने पैसे पाठवायचे असल्यास, साईदेवी हे खाते फोन पे आणि पेटीएम खाते वापरते.
पण साईदेवी हे युपीआय आईडी अॅप फोनवर अधिक वापरते, साईदेवी हिचे सोशल मीडियावर इन्स्टाग्राम खाते आहे आणि तेथे अनेक मित्र आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून साईदेवी ही आरोपी देविका एम. नावाच्या इंस्टाग्राम युजरशी मेसेजद्वारे बोलत होती, साईदेवी हे देविका हिला ओळखत नसुन साईदेवी फक्त मेसेजद्वारे बोलत होती.
तीन दिवसांपूर्वी साईदेवी हिची इंस्टाग्राम मैत्रिण देविका एम हिने साईदेवी हिला मेसेज केला आणि म्हटले की आम्ही गेल्या ३ महिन्यांपासून मेसेजवर बोलत आहोत, तुमचा फोन नं. मला द्या, मी तुम्हाला कॉल करेन किंवा व्हॉट्सअॅपवर मेसेज करेन म्हणून साईदेवी हिने आपला फोन नंबर ८४५९१३६२५३ हा दिला होता. पण देविका एम हिने साईदेवी हिला फोन या व्हॉट्सअॅप वर मेसेज केला नाही.
साईदेवी हिला बुधवार (दि.१७) मई ला सकाळी ९३० वाजता च्या दरम्यान काही पैसे द्यायचे होते. म्हणून साईदेवी ही युपीआय आईडी अॅप ने आपल्या फोनवर खाते शिल्लक तपासत होती तेव्हा साईदेवी हिला खात्यात २१४ रु शिल्लक आणि १८,००० कमी दिसले.
तेव्हा साईदेवी हे युनियन बँक शाखा कांद्री येथे येऊन बँक पास बुक छापली, त्यानंतर साईदेवी हिला १८,००० रुपये तिच्या युपीआय आईडी मधुन देविका नावाच्या एचडीएफसी ५०१००५३१३६५ या बैंक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहे असे दिसून आले.
तेव्हा साईदेवी हिच्या लक्षात आले कि माझी एक देविका एम नावाची मैत्रीण इंस्टाग्राम, या सोशल मीडिया अॅपवर आहे, साईदेवी हिने देविका एम ला इंस्टाग्राम वर मॅसेज पाठवला आणि विचारले कि माझे १८,००० रु तुझ्या खात्यात ट्रान्सफर झालेले दिसत आहेत, तेव्हा देविका एम ने साईदेवी हिला सांगितले की माझ्या बँक खात्यातून ५०,००० रुपये देखील काढले गेले आहेत, म्हणून ती पोलिस स्टेशन ला जाऊन तक्रार देत आहे. मग मी तुझ्याशी बोलते. मग बराच वेळ झाला तरी साईदेवी हिला देविका एम चा मेसेज आला नाही म्हणून साईदेवी हिने मेसेज साठी देविका एम चे इंस्टाग्राम सुरु केले असता साईदेवी हिला देविका एम चे इंस्टाग्राम दिसले नाही.
बुधवार (दि.१७) ला साईदेवी हिची इंस्टाग्राम मैत्रीण देविका एम हिने फसवणुक करुन साईदेवी हिचा फोन पे युपीआय आईडी मधुन १८,००० रुपए काढुन आपल्या बैंक अकाउंट मध्ये ट्रांसफर केले. साईदेवी हिने देविका एम हिला पैसे बाबत विचारले असता आपली इंस्टाग्राम आईडी डिलीट केली.
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी साईदेवी व्यंकटेश्वर कुचपुडी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी देविका एम विरुद्ध अप क्रमांक २९१२३ कलम ४२० भांदवि, सहकलम आईटी एक्ट ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात पोलीस हवालदार फुटाने हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
0 टिप्पण्या