सुरगाणा नगरपंचायत येथे विकासकामांचे भूमिपूजन
सुरगाणा:- सुरगाणा नगरपंचायत अंतर्गत शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन सुरगाणा तालुक्याचे माजी आमदार कर्मयोगी कॉ. जे. पी. गावित यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्र. 12 मधील रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटार तसेच प्रभाग क्र.11 मधील गटारीचे बांधकाम करणे, या दोन्ही कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष भारत आप्पा वाघमारे यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की, शहराच्या विकासाची कामे करीत असतांना आम्हांला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
तरीही आम्ही आमच्या जिद्दीने व प्रशासनाच्या सहकार्याने आत्ता पर्यंत 3 कोटी 20 लाखाची कामे करून मंजूर करून आणली आहेत. तसेच शहरातील पाणीप्रश्न असेल, स्मशान भूमीचा प्रश्न असेल याचप्रमाणे इतर विकास कामांचे प्रस्ताव शासन दरबारी मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच या कार्यक्रम प्रसंगी बोलताना कॉम्रेड जेपी गावित म्हणाले की, सुरगाणा शहराच्या पाणी प्रश्न व स्मशानभूमी संदर्भात नगराध्यक्ष नगरसेवक तसेच शहरातील प्रमुख कार्यकर्ते यांचे शिष्ट मंडळ घेऊन मी स्वतः माननीय मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार.
प्रतिनिधी:- किशोर जाधव,सुरगाणा-नाशिक
0 टिप्पण्या