Advertisement

मासले बेलपाडा येथील चार बोरवेल चोरीला महिलांचा पाण्यासाठी मोर्चा पंचायत समिती वर

मासले बेलपाडा येथील चार बोरवेल चोरीला महिलांचा पाण्यासाठी मोर्चा पंचायत समिती वर

मुरबाड तालुक्यातील मौजे मासले बेलपाडा येथील चार बोरवेल चोरीला गेल्याची घटना घडल्याने महीला चा पाण्यासाठी मोर्चा गुरूवारी पंचायत समितीवर काढण्यात आला होता.

https://www.youtube.com/watch?v=Fr1MvaygpYU

मासले बेलपाडा येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजना 2019 इस्टिमेट बनवून 54 लाख रुपये काढलेचे निदर्शनास आले असून, याबाबत गुरूवारी मासले बेलपाडा येथील महिलांनी मोर्चा काढून संबंधित अधिकारी बनकरी व ठेकेदार यांच्या वर कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल करुन अधिकारी बनकरी यांना निलंबित करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

तसेच या गावात चार बोरवेल आहेत असे दाखवून बिले काढली आहेत गावकरी बोलतात आमच्या गावात बोरवेलच नाहीत तर कागदोपत्री नोंद कशी केली. गटविकास अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले असून संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले.

प्रतिनिधी:- राजेश भांगे मुरबाड-ठाणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या