Advertisement

वंचित बहुजन आघाडी शाखा कन्हान तर्फे 10 मे "स्वाभिमानी दिवस" साजरा

वंचित बहुजन आघाडी शाखा कन्हान तर्फे 10 मे “स्वाभिमानी दिवस”

कन्हान:- वंचित बहुजन आघाडी शाखा कन्हान तर्फे 10 मे “स्वाभिमानी दिवस” पक्षाचा वतीने पक्ष कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वाघधरे चाळ इथे वंचिताचे स्वाभिमानी नेते श्रद्धेय.बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी मुख्य चौकात असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर कार्यालया समोर जोरदार आतिषबाजी फटाके फोडून आणि केक कापून केक वितरित करत ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला.

कु.नंदिनी बंडू वंजारी यांनी केक कापला तसेच पक्षातील सदस्यांनी आनंदी प्रसंगी एकमेकांना केक चारून शुभेच्छा दिल्या. तसेच इतर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना केक वितरण केला गेला. या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित कन्हान शहर अध्यक्ष नितेश मेश्राम, नागपूर जिल्हा पदधिकारी स्वप्नील विनायकजी वाघधरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र फुलझेले, तालुका उपाध्यक्ष चंद्रमणी पाटील,सुशील कळमकर ,राजेश सोमकुवर,नरेश चिमणकर,आनंद चव्हाण ,मनोज गोंडाने,मोंटू राऊत, अक्षय मोटघरे, पियुष वाघधरे, हिमांशू वासे, रितिक कापसे, प्रियांशु वाघमारे,अर्पित रंगारी, निखिल चवरे,प्रमोद दहिवलकर गुरुजी,सोनू खोब्रागडे,अमित पाटील,सतीश ढबाले,निशांत मोटघरे,रोशन गजभिये,आदित्य टेभूरणे,कन्हान शहर प्रवक्ता रजनीश वामन मेश्राम,अनिकेत पुरवले, विजय बहादुरे सह वंचित बहुजन आघाडी अनेक सदस्य हजर होते.

प्रतिनिधी:- ऋषभ बावनकर,कन्हान-नागपूर

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या