कांद्री येथे श्रीराम नवमी महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात संपन्न
कन्हान-कांद्री संताजी नगर येथे हनुमान मंदिरात भुमीपुत्र युवा प्रतिष्ठान द्वारे श्रीराम नवमी महोत्सव विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला.
गुरुवार दिनांक ३० मार्च ला भुमीपुत्र युवा प्रतिष्ठान द्वारे श्रीराम नवमी निमित्य संताजी नगर कांद्री येथे हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्व हिंदु परिषद राष्ट्रीय महामंत्री मा.मिलिंदजी परांडे, प्रमुख अतिथि विदर्भ प्रांत मंत्री विश्व हिंदु परिषद मा.प्रशांतजी तितरे, समाजसेवी देवेंद्र आखरे, भगवान चकोले सह आदि मान्यवरांचा हस्ते हनुमान आणि श्रीराम च्या प्रतिमेचे पुजन करुन जय श्री राम, जय जय श्री राम असा जयघोष करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी मिलींद परांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांनी म्हटले कि आम्ही सर्व हिंदु संघटित होऊन कसे स्वीकारावे आणि समाजात समाजातील दुभंगलेल्या हिंदूंना संघटित होऊन भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचे आवाहन केले. तसेच श्रीराम यांनी केलेले प्रयत्न, लढण्याचे कौशल्य आणि क्षत्रिय धर्माचे पालन, सर्व सद्गुणांचे पालन करून सर्व हिंदूंनी हे चरित्र आपल्या जीवनात सामावून घ्यावे, असे आवाहन केले. त्यानंतर भुमिपुत्र युवा प्रतिष्ठान द्वारे मा.मिलींद परांडे यांना श्रीराम ची सुंदर प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी अतुल हजारे, रामभाऊ दिवटे, शंकर चहादे, मनोहर पाठक,योगेश वाडीभस्मे, राजेश पिल्ले, पारस यादव, सौरभ पोटभरे, उध्दवजी चौधरी, टिपू सिंघ, दिनेश राऊत, दिनेश खाडे , शुभम यादव, चंदू ठाकरे, कामेश्वर शर्मा, सचिन कामडे लोकेश आंबाडकर, चक्रधर आकरे, गुरुदेव चकोले, शेखर गिर्हे, मुकेश खरसोलिया, मनोज कुरडकर, राजेंद्र शेंदरे, रमेश हजारे, सुरेश गुरव, अमिश रुंघे, वीर सिंग, मारोती बावणे, गणेश किरपान, सत्यनारायण राय, जगन शेंदरे, लल्ला देहरिया, मोहित राठोड, संजय लांडगे, पितांबर डोकरीमारे, मनोज वडे, सतीश झलके, दिनेश नांनवटकर, अरुणा हजारे, वंदना गडे, राखी गभने, बबली सिंह, रिता राजनकर, रितू मस्के, पौर्णिमा ठाकरे, रुपाली हजारे सह आदि धर्मप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या