ट्रेन समोर उडी मारून शिक्षकाची आत्महत्या
कन्हान – शहरातील बळीराम दखने हायस्कुल चे शिक्षक मनोजसिंह चौहान यांनी तारसा रोड रेल्वे क्रॉसिंग च्या जवळ नागपुर वरून भंडारा कडे जाणाऱ्या रेल्वे माल गाडी समोर उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळखळ उडाली आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार (दि.२४) एप्रिल ला रात्री ९ ते १०.३० वाजता दरम्यान बळीराम हॉयस्कुल कन्हान येथील सहाय्यक शिक्षक मनोज सिंह धीरसिंह चौहान वय ५४ वर्ष राह. राधाकृष्ण नगर कन्हान यांनी तारसा रोड रेल्वे क्रॉसिंग गेट जवळ नागपुर वरून भंडारा कडे जाणाऱ्या रेल्वे मालगाडी समोर उडी मारुन आत्महत्या केली . आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही . शिक्षक मनोज सिंह धीरसिंह चौहान यांचा घटना स्थळीच मुत्यु झाला . सदर घटने नंतर शिक्षक मनोजसिंह चौहान यांचा मृतदेह शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले होते . शवविच्छेदन करून कामठी पोलीसांनी त्याच्या नातेवाईकांना मृतदेह सुपुर्द केला . त्याचे राहते घर राधाकृष्ण नगर कन्हान येथुन मंगळवार (दि.२५) एप्रिल ला दुपारी २.३० वाजता अंतिम यात्रा काढुन कन्हान नदी शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात आला. ते मागे पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार सोडुन गेले.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या