कन्हान येथे महानत्यागी बाबा जुमदेव यांचा १०२ व्या जयंती निमित्य दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान – कन्हान येथे बाबा हनुमानजी सेवक संस्था कन्हान – पिपरी द्वारे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा १०२ व्या जयंती निमित्य दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
आज सोमवार दिनांक ३ एप्रिल रोजी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा जयंती निमित्य महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे .
उद्या मंगळवार दिनांक ४ एप्रिल रोजी सकाळी ५:३० वाजता सामुहिक हवन , ८:०० वाजता भव्य शोभायात्रा , दुपारी १२:०० वाजता महानत्यागी बाबा जुमदेवजींचे स्वगत , १:०० वाजता मान्यवरांचे स्वागत , १:३० वाजता भगवत कार्याची चर्चा बैठक , सायंकाळी ५:०० वाजता पासुन भोजन ग्रहण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे .
या दोन दिवसीय कार्यक्रमात शहरातील सर्व सेवक , सेवकांनी , आणि नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे कडकडीचे आव्हाहन आयोजकांनी केले आहे .
या कार्यक्रमाचे आयोजक आणि यशस्वितेकरिता संस्थेचे अध्यक्ष गोपीचंदजी सावरकर , उपाध्यक्ष संजय भैस , कोषाध्यक्ष दिनेश देशमुख , सहसचिव मानिकजी पोटे सह आदि सदस्य सहकार्य करीत आहे .
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या