येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
कन्हान – परिसरातील येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सरपंच कु.सोनुताई इरपाते यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात केली. उपसरपंच धनराज हारोडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी येसंबा ग्रामपंचायत सदस्या सौ.करिश्मा पानतावणे, सदस्या सौ.ज्ञानेश्वरी घरजाळे, मा.जिवन चकोले, मा.हर्षद हारोडे, ग्रामपंचायत कर्मचारी मा.संजय गजभिये सह आदि अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या