राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वर भीषण अपघात , दुचाकी वाहन चालका चा मृत्यु
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील वाघोली शिवारात दुचाकी वाहन चालकाचे नियंत्रण सुटुन दुभाजकावर आढळल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालक सौरभ हिरनवार यांचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी मुदस्सीर अहमद यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार (दि.२३ एप्रिल) ला दुपारी १:५४ वाजता च्या दरम्यान फिर्यादी मुदस्सीर रजा वल्द ईजाज अहमद वय २६ वर्ष रा.कोळसा टाल कामठी यांचा साळा दुचाकी वाहन चालक मृतक सौरभ रोशन हिरनवार वय २३ वर्ष रा.आंबेडकर नगर मनसर हा आपल्या केटीएम दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४९ एजी ६६५५ ने कामठी वरुन मनसर ला जात होता . मुदस्सीर अहमद यांचा फोन वर साळाच्या फोन वरुन दुपारी २:०० वाजता फोन आला कि वाघोली शिवारात तुमच्या साळाच्या अपघात झाला आहे . अश्या माहिती वरुन मुदस्सीर अहमद यांनी घटनास्थळी पोहचुन पाहणी केली असता लोकांची गर्दी दिसुन आली आणि साळा सौरभ हिरनवार हा जख्मी अवस्थेत रोडा वर पडुन होता .
तेथील स्थानिक नागरिकांनी मुदस्सीर अहमद यांना सांगितले कि साळा सौरभ हिरनवार यांची दुचाकी वाहन अचानक दुभाजकावर आढळली आणि वाहन तिथेच स्लीप झाल्याने सौरभ हा खाली रस्त्यावर पडल्याने डोक्याला जबर मार लागुन गंभीर जख्मी झाला . सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस हवालदार हरीष सोनभ्रदे आणि नापोशि सचिन वेळेवर यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन जख्मी सौरभ हिरनवार याला मुदस्सीर अहमद यांनी रुग्णवाहिके च्या मदतीने कामठी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासुण त्याला मृत घोषित केले .
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी मुदस्सीर अहमद यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला कलम २७९ , ३०४(अ) भांदवि सहकलम १८४ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात पोलीस हवालदार हरीष सोनभ्रदे आणि सचिन वेळेकर हे करीत आहे .
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या