Advertisement

कन्हान उपकेंद्र तारसा रोड येथुन ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी

कन्हान उपकेंद्र तारसा रोड येथुन ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत २ किमी अंतरावर असलेल्या मौजा एम.एस.ई.टी.सीएल २२० के.व्ही कन्हान उपकेंद्र तारसा रोड येथुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी धम्मरत्न मेश्राम यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार (दि.२२) ला रात्री २:०० ते सकाळी ६:०० वाजता च्या दरम्यान मौजा एम.एस.ई.टी.सीएल २२० के.व्ही कन्हान उपकेंद्र तारसा रोड येथील कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चैन लिंक फैसिंग कापून आत मध्ये प्रवेश करुन एका बाजुने चालु असलेले २२० के.व्ही अल्ट्राटेक आणि २२० के. व्ही.उमरेड २ चे ऑक्सीलियरी बस इसॉल्टोर चे प्रत्येकी आर आणि बी फेसचे इसुलेटर फोडून ४ नग त्यावरील कॉपरचे ब्लेड अंदाजे किंमत ५२,००० रूपयाचा मुद्देमाल चोरून नेला.

सदर प्रकरणी फिर्यादी नामे धम्मरत्न महादेव मेश्राम वय ४२ वर्ष, रा.एम.एस.ई.टी.सीएल २२० के. व्ही उपकेंद्र तारसा रोड कन्हान यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३७९ भादंवि कायद्यान्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांचा मार्गदर्शनात सहायक फौजदार सदाशिव काठे हे करीत आहे.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या