टेकाडी येथे महात्मा जोतिबा फुले जयंती माल्यार्पण आणि अभिवादन करुन थाटात साजरी
समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्थे द्वारे कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था टेकडी द्वारे फुले चौक टेकाडी येथे महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले यांची १२६ वी जयंती माल्यार्पण आणि अभिवादन करून थाटात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमात सर्व प्रथम मान्यवरांचा हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित टेकाडी ग्रामपंचायत सरपंच मा.विनोद इवनाते व आदि मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी .
कार्यक्रमाची प्रास्ताविका निलेश गाढवे संस्थापक अध्यक्ष समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था यांनी मांडली , कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिनेश चिमोटे यांनी केले .
या प्रसंगी सदानंद वासाडे , चंद्रप्रकाश नागतोडे , प्रशांत टाकळखेडे , अजित मोहाडे , सचिन टाकळखडे , गुरुकृपा आखाडाचे विद्यार्थी अनिकेत निमजे , सुरज चव्हाण , आदेश आंबागडे , सह आदी ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते .


0 टिप्पण्या