स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दोन कचरा गाडी (घंटागाडी) लोकार्पण सोहळा संपन्न
सुरगाणा :- सुरगाणा नगरपंचायत मार्फत आज दिनांक २५०४२०२३ रोजी झेंडा चौक, सुरगाणा येथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दोन कचरा गाडी (घंटागाडी) लोकार्पण सोहळा पार पडला. या प्रसंगी सुरगाणा नगरपंचायतचे माननीय नगराध्यक्ष श्री.भारत लक्ष्मण वाघमारे, उपनगराध्यक्ष श्रीमती माधवी थोरात, शिवसेना गटनेते तथा नगरसेवक श्री.सचिन आहेर, सभापती श्री.सचिन महाले, एकनाथ भोये, दीपक शेठ थोरात, दिनकर शेठ पिंगळे, अबू मौलाना आझाद शेख, दिनकर वाघ, योगेश थोरात, बाळू शेठ बिरारी, कैलास सूर्यवंशी, ईश्वर थोरात, मेहमुद शहा, धिरज सूर्यवंशी, महावीर पगारिया, विजू शेख, सुरेश रहेराव, सोमनाथ पवार, सुरगाणा शहरातील ग्रामस्थ व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच सुरगाणा नगरपंचायत कार्यालय अधीक्षक विजय जाधव व लेखापाल अनिरुद्ध कदम, सर्व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला.
प्रतिनिधी – किशोर जाधव सुरगाणानाशि
0 टिप्पण्या