Advertisement

अंगणवाडी सेविकांचा पर्यटनस्थळ रामधाम येथे सत्कार समारोह

अंगणवाडी सेविकांचा पर्यटनस्थळ रामधाम येथे सत्कार समारोह

राज्य अंगनवाडी कर्मचारी सुरक्षा संघ नागपूर च्या वतीने नुकतेच जागतीक पर्यटनस्थळ रामधाम,मनसर,येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.मेळाव्याचे उद्घाटन पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी केले. या मेळाव्यात अंगणवाडी मध्ये सर्वोत्कृष्ठ सेवा देणाऱ्या दहा अंगणवाडी सेविकांचा सत्कार पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते  करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद सौ संध्या चौकसे  यांनी भुषविले.

तर प्रमुख पाहुणे  म्हणुन   दशोदा पटले, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे,  लक्ष्मिकांत हजारे,  देवेंद्र काळबांडे, चंद्रशेखर शुक्ला,  अशोक गुरव,  निर्मला निखाडे,  सतिश गद्रे, राहुल शाहु, सुजाता नागदेवे,  वसुधा काणे,  लिला मेहर हया उपस्थित होत्या. तर कार्यक्रमास राहुल पिपरोदे, राजु कापसे, अविनाश शेंडे, पंकज बावनकर,  सुशीलाताई बावनकर व मोठ्या संख्येने अंगनवाडी सेविका उपस्थित होत्या.

१) रामधाम मनसर तालुका रामटेक  येथे समारोह

2 ) दहा सर्वोत्कृष्ठ सेवा देणाऱ्या महिलांचा सत्कार

2 ) पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचे हस्ते सत्कार

4 ) सत्कार समारोहात 200 पेक्षा जास्त सेविका उपस्थीत

प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक-nagpur

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या