टेकाडी येथे रामनवमी ते हनुमान जयंती सप्ताह प्रारंभ, घट स्थापना करून सतत २४ तास उभे राहुन अखंड भजन
कन्हान – टेकाडी येथे अनेक वर्षाच्या परंपरे नुसार या वर्षी श्री हनुमान मंदीर पंच कमेटी टेकाडी व्दारे श्रारीम नवमी च्या पुर्व संध्येला भव्य शो़भायात्रेचे गाव भ्रमण करून दुसऱ्या दिवसी रामनवमी ला पुजा अर्चना, घटस्थापना करून श्रीराम नवमी ते श्री हनुमान जयंती पर्यंत अखंड भजन सप्ताहा चा शुभारंभ करण्यात आला. श्री हनुमान जयंती ला घट विसर्जन करून भव्य महाप्रसादाने अखंड भजन सप्ताहाचा समारोप करण्यात येईल.
बुधवार (दि.२९) मार्च ला श्री हनुमान मंदीर पंच कमेटी टेकाडी (को ख) व्दारे श्री राम नवमी च्या पुर्व संध्येला भव्य पालखी, शोभायात्रा काढण्यात आली. यात बालगोपालांनी विविध वेशभुषा साकारल्या होत्या जसे श्री राम, लक्ष्मण, सीता व हनुमान तसेच गावातील शाळेकरी मुलांची लेझिम, गुरुकृपा मर्दानी आखाडा राम सरोवर टेकाडी यांनी शिवकाळीन कले चे प्रात्याक्षिक सादर केले. विशेष म्हणजे भोलेनाथ हे बैलबडी वर विराजमान झाले होते. पालखी शोभायात्रा मंदिरातुन प्रस्थान करून संपुर्ण गाव भ्रमण करण्यात आले.
या पालखी शोभायात्रेचे पुजन, आरती, फुलाचा वर्षाव करून महिलांनी स्वागत केले. गाव भ्रमणा च्या स्वागत वेळी कुठे शरबत कुठे नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. परमात्मा एक मंडळ टेकाडी तर्फे शरबत वितरण, पंचकृष्ण मंदिरा व्दारे नाश्त्या वितरण आणि फुले चौकात थंड मठ्ठ्याची व्यवस्था करण्यात आली होती. मंदीरात पोहचुन पुजा, अर्चना व आरती करून सर्व भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी गुरूवार (दि.३०) मार्च ला श्रीराम नवमी ला सकाळी पुजा, अर्चना घटस्थापना करून अखंड भजन सप्ताहा चा शुभारंभ करण्यात आला. सतत २४ तास सात दिवस अखंड भजन गायन सुरू राहील. या मध्ये गाव व गावाबाहेरील भजन मंडळाच्या उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. यात श्री देवमनजी हुड भजन मंडळ, जय बजरंग भजन मंडळ, जय रघुनंदन भजन मंडळ, आरतीगण भजन मंडळ, जय माँ दुर्गा भजन मंडळ, संत गजानन भजन मंडळ यांचा सहभाग असणार आहे.
श्री हनुमान मंदिराला विशेष मनमोहक विधृत रोषणाई केली आहे. श्री हनुमान जयंती च्या दिवशी घट विसर्जन करून महाआरती व भव्य महा प्रसाद वितरण करून अखंड सप्ताहाची सांगता करण्यात येईल. पंचकोशीतील गावकरी, नागरिक येथील महाप्रसादाचा लाभ घेतात. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता श्री हनुमान मंदिर पंच कमिटी टेकाडी व संपुर्ण ग्रामस्थ सहकार्य करित आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
0 टिप्पण्या