Advertisement

विषारी औषध सेवन केल्याने महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यु

विषारी औषध सेवन केल्याने महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यु

कन्हान –  कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत निलज (खंडाळा) शिवारात महिलेने आपल्या राहत्या घरी विषारी औषधीचे सेवन केल्याने उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार मृतक श्रीमती प्रमिला कन्हैयालाल खैरकर वय ५५ वर्ष रा.निलज हीने सोमवार (दि.३) एप्रिल ला सकाळी ११ वाजता च्या दरम्यान बीपी आणि शुगर चा त्रास असल्यामुळे ते घरी ऐकटी असतांना तांदळात ठेवलेले सनस पान नावाचे विषारी औषध सेवन केले.

मृतक महिलेची प्रकृती खराब झाली असता उपचारा करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी उपचार करुन मेयो रुग्णालय नागपुर येथे रेफर केल्याने सायंकाळी ५१८ वाजता च्या दरम्यान  वार्ड क्रमांक एम आई सीयु मध्ये आणुन भर्ती केले. उपचारा दरम्यान डॉ.एच ओ समीक्षा यांनी तपासुन रात्री १११५ वाजता च्या दरम्यान मृत्यु घोषित केले.

सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी पोलीस हवालदार प्रदीप ठाकुर, पोलीस शिपाई निखिल मिश्रा, पोलीस नापोशि महेंद्र जळीतकर यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला  कलम १७४ जाफौ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या