नागपुर ते रामटेक दिंडी, पायदळ वारी चे कन्हान शहारात जल्लोषात स्वागत
सर्वश्री वारकरी सांप्रदाय सेवा समिती व्दारे दि.२७ ते ३१ मार्च दिंडी सोहळा
कन्हान – श्री वारकरी सांप्रदाय सेवा समिती व्दारे श्रीराम नवमी निमित्य दिंडी सोहळा २० व्या वर्षी संत ज्ञानेश्वर मंदिर जुनी मंगळवारी, नागपुर ते श्री क्षेत्र रामटेक पायदळ वारी दिंडी चे कन्हान – कांद्री शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
गुरुवर्य हभप श्री.अमृत महाराज कहाळे यांच्या आशिवार्दाने दिंडी सोहळा चैत्र शु.षष्ठी, सोमवार (दि. २७) मार्च ला संत ज्ञानेश्वर मंदिर जुनी मंगळवारी नागपुर येथे सकाळी ७ वाजता अभिषेक करुन दुपारी १२ वाजता महिला भजन मंडळाचे भजन, किर्तन करुन दुपारी ४ वाजता दिंडीचे प्रस्थान झाले. सायंकाळी ५ वाजता श्री विठ्ठल राधाकृष्ण दवाखाना वर्धमान नगर ला चहा पान, सायंकाळी ७ वाजता भवानी माता मंदीर पारडी येथे भजन, किर्तन आणि भोजन ग्रहण करुन मुक्काम करण्यात आला.
मंगळवार (दि.२८) ला सकाळी ६ वाजता पारडी येथुन प्रस्थान होत ७ वाजता भरतवाडा येथे फराळ, १० वाजता कामठी रोड मढी दुर्गा माता मंदीर घोरपड ला भोजन, साई मंदीर कामठी येथे चहापान करुन सायंकाळी ६ वाजता श्री संताजी स्मृती सभागृह कन्हान कांद्री येथे आगमन होताच तेली समाज कार्यकारी मंडळा च्या महिलांनी, नागरिकांनी फुलांच्या वर्षाने, पुजा, अर्चना, प्रसाद वितरण करुन दिंडी पायदळ वारी चे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर भजन, किर्तन आणि भोजन करुन मुक्काम करण्यात आला.
दिंडी सोहळयाचे स्वागत श्री संताजी स्मृती सभागृह कार्यकारी मंडळ तेली समाज कन्हान-कांद्री संचालक मंडळ अ़ध्यक्ष शरद डोणेकर, कार्याध्यक्ष पुरूषोत्तम बेले, सचिव अशोक हिंगणकर, संपर्क प्रमु़ख वामन देशमुख, कोषाध्यक्ष मनोहरराव कोल्हे, पतिराम देशमुख, लक्ष्मीकांत गिरडकर, देवचंद कुंभलकर, अल्का कोल्हे, लता बावनकुळे, कल्पना देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, शिवाजी चकोले, राजेश पोटभरे, प्रकाश हटवार, धर्मराज घोपटे, ओमदास लाठे, सुरेश आंबागडे, राजहंस वंजारी, सह आदि नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.
बुधवार (दि.२९) ला सकाळी ६ वाजता श्री संताजी सभागृह येथुन प्रस्थान करुन ६.३० वाजता कांद्री ला दिंडी चे स्वागत ८ वाजता बोरडा येथे चहापान ९.३० वाजता निमखेडा ला अल्पोहार, ११ वाजता नगरधन येथे भोजन, दुपारी. ४ वाजता मानापुर येथे चहापान, सायंकाळी ५ वाजता रामटेक शहरात आगमन, स्वागत करण्यात आले.
दिंडी भजनकिर्तन व्यवस्थापक- सर्व श्री वारकरी सांप्रदाय सेवा समिती दिंडीचे आधारस्तंभ व सहकारी सर्व श्री हभप वाल्मीकराव आंबेकर, पांडुरंगजी मेहर, बबनराव लंगडे, रमेश वनकर, सुरेस लांडे, रविंद्र काळे, बाबुराव बडगे, भाऊ राव चुरड, नामदेव घोडमारे, विनायक इंगळे, विजय उशकवार, रामदास आगाशे, संजय सिंग, सुर्यवंशी, महेश सिंग गौर, ज्ञानेश्वर मंदिर समिती, पुरुषोत्तम माथणे, निळकंठ नंदनकर, वेणुताई काळे, अर्चनाताई लांड, पुरुषोत्तम उमरेडकर, गोपाल चरडे, मनोहर पौनी कर, विष्णुजी चरडे,
गिरधर गच्चीवाले, खुशाल वैराळ कर, महेश नंदनकर, रामाजी खडगी, अरविंद चर्लेवार, नरेश नगरधने, स्नेहल नंदनकर व इतर सहकारी भरत वाडा चे रमेश महादेवराव साबरे, विष्णुजी रामचंद्र साबरे, समस्त गावकरी घोरपड दुर्गा देवी मढी मंदिर घोरपड रोड कामठी, अध्यक्ष शिवराम प्रसाद चौधरी, कोषाध्य क्ष ईश्वरचंद चौधरी व सदन यादव, कन्हान श्री संताजी स्मृती सभागृह संचालक मंडळ, बोरडा मधुकर बंड,
अंकुश पाटील, नरेंद्र महल्ले, राजुजी राऊत, गुंडेरा व बंड, कृष्णाजी कुहीटे, अशोक बंड, रामराव नांदुरकर, गावकरी निमखेडा सुनिल वाडीभस्मे (पाटील), सम स्त गावकरी नगरधन सर्व श्री हभप गोविंदराव गायधने, सुभाष मानकर, सुधाकर कामडी, विकास कामडी, खेमराज कामडी समस्त गावकरी मानापुर उमाकांत पोफळी, हभप अजय महाराज, हभप दिलीप पाटील, रामटेक हभप. झाडे महाराज, डॉ. कमलाकर लेंडे, सुर्यभान बालपांडे, पडोळे साहेब, मानकर साहेब, विश्वनाथ कापसे, मोतीराम घरजाळे, मनोहर बावनकर, प्रेम लाल पोटभरे, चंदुभाऊ आंबागडे, श्री गजानन भजन मंडळ सह आदी परिश्रम घेत आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या