लग्नाचे खोटे आमिष दाखवुन मुलीला गरोदर करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, आरोपी अटक
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नांदगाव (डुमरी) येथील घरा शेजारी राहणाऱ्या विशाल तिरकमठे यांने मुलीला लग्नाचे आमिष दा़खवुन वारंवार शारिरीक संबध करून मुलीला तीन महिण्याची गरोदर करून लग्न करण्यास नकार दिल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी मुली च्या तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी विशाल तिरकमठे विरुध्द गुन्हा दाखल करून अटक करित पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार नांदगाव डुमरी येथील राहणारा मुलगा विशाल गोपाळराव तिरकमठे वय २५ वर्ष याने गावातीलच घरासमोरी २० वर्षीय मुली सोबत मित्रत्वा च्या नात्याने चांगले संबंध प्रस्तापित करून सन २०२१ मध्ये मुलीचा मोबाईल नंबर मागुन तेव्हा पासुन फोन वर बोलत होता.
(दि.२) सप्टेंबर २०२२ विशाल चे घरी कोणी हजर नसल्याने त्याने दुपारी १२ वाजता त्याचे घरी मुलीला एकटी बोलावुन मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे, असे म्हणुन मुलीचा हात पकडुन पहिल्यांदा शारिरीक संबंध केले.
त्या महिण्यात आरोपी विशाल ने वेगवेगळ्या दिवशी दोन ते तीन वेळा जबरी संभोग केले. त्यानंतर आरोपी विशाल ने डिसेंबर २०२२ ला आमडी फाटा जवळील लॉज येथे नेऊन वारंवार शारिरीक संबंध केले.
दोन महिण्यापुर्वी पासुन विशाल हा नजर अंदाज करु लागला आणि मुली सोबत लग्न करण्यास नकार सुद्धा दिला. त्यामुळे बोलणे चालने बंद झाले होते.
बुधवार (दि.५) एप्रिल २०२३ ला सकाळी मुली च्या आईने तिला विचारले की, तु महिन्यावर पाळीवर बसत आहे की नाही. तुझे पोट कसं काय निघाले तेव्हा मुलीने आईला खरी हकीकत सांगितली की, विशाल तिरकमठे याने माझे सोबत शारीरिक संबंध केल्यामुळे मी ३ महिन्याची गरोदर झाली आहे. माझ्या पोटात जे बाळ आहे ते विशाल याचे आहे.
भीतीपोटी मी कोणालाही काहीच सांगितले नव्हते. असे म्हटल्या वर आई ने मुलीला विश्वासात घेत धिर दिल्याने मुलीने आई सोबत पोलीस स्टेशन गाठुन विशाल तिरकमठे याने लग्न करण्याचे आमीष दाखवुन माझे सोबत जबरदस्तीने वारंवार शारिरिक संबंध करून गरोदर केले व आता लग्न करण्यास नकार देत आहे.
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी मुली च्या तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी विशाल विरूध्द कलम ३७६, ३७६ (२) (एन) भादंवि अन्वये गुन्हा दाखल आणि अटक करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभेरे हे करीत आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या