Advertisement

कन्हान मध्ये आज मा.श्री शरद पवार यांचे स्वागत कार्यक्रम

 

कन्हान मध्ये आज मा.श्री शरद पवार यांचे स्वागत कार्यक्रम

कन्हान – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री शरद पवार आणि राज्याचे माजी गृहमंत्री मा.श्री अनिल देशमुख आज 2 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता कन्हान येथे येणार आहेत . यावेळी कन्हान येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे . मा.श्री शरद पवार हे भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री राहिले आहेत. ते महाराष्ट्र राज्याचे ३ वेळा मुख्यमंत्री सुद्धा राहिले आहेत . त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पद ही भूषवले आहे .

मा.श्री शरद पवार यांचे रामटेक विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस कन्हान शहर , राष्ट्रवादी काँग्रेस कांद्री शहर , राष्ट्रवादी काँग्रेस महिला मोर्चा आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आंबेडकर चौक येथे स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मा. चंद्रशेखर भीमटे , रामटेक विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष मा.किशोर बेलसरे , रामटेक विधानसभा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष मा.देवीदास तडस , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कन्हान शहर अध्यक्ष मा.अभिषेक बेलसरे , सदस्य मा.आनंद बेलसरे , सतीश बेलसरे सह आदि ने केले आहे.

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या