समतापर्वाचे उद्घाटन संपन्न
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका रामटेक व मौदा यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त समतापर्वाचे उद्घाटन ग्राम विकास अध्यापक विद्यालय, मारोडी येथे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मधुसूदन खोब्रागडे सर होते.संचलन मौदा समतादूत ओमप्रकाश डोले यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्या मंजूषा ठवकर यांनी केले. आभार प्रदर्शन मौदा समतादूत दुर्योधन बगमारे यांनी केले.
रामटेक समतादूत राजेश राठोड यांनी 01एप्रिल ते 14 एप्रिल 2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात समतापर्वाचे आयोजन बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभाग प्रमुख डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण व नागपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी ह्रदय गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असून ॲट्राॅसिटी ॲक्ट 1989, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005, माहितीचा अधिकार,सफाई कामगार यांचे पुनर्वसन कायदा 2013 व इतर जन कल्याणकारी योजनाबाबत जनजागृती विषयक कार्यक्रम तसेच निंबध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व लघुनाट्य स्पर्धांचे आयोजन रामटेक व मौदा तालुक्यात आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला अध्यापक विद्यालयातील सर्व प्रशिक्षणार्थी तसेच अधिव्याख्याता पुष्पलता बोरीकर, खुमेंद्र रहांगडाले,निशा पटले,निरूषा ठवकर उपस्थित होते.
प्रतिनिधी प्रणय बागडे-ramtek
0 टिप्पण्या