आमदार आशिष जयस्वाल यांचा हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन
कन्हान – पारशिवनी तालुक्यातील गट ग्राम पंचायत खंडाळा घटाटे येथे (दि.२०) एप्रिल रोजी आमदार मा.आशिषजी जयस्वाल रामटेक विधानसभा यांचा हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पाडले.
जल जिवन मिशन कार्यक्रमांतर्गत ६९ लक्ष ८४ हजार रुपये २० हजार लिटर पाण्याची टाकी आणि ४१०० मीटर पाईप लाईन, तसेच खंडाळा घटाटे पोच रस्त्याची सुधारणा करण्यासाठी रु.१ कोटी, खंडाळा घटाटे पोच रस्ता बांधकाम करण्यासाठी रु.४० लक्ष, आणि खंडाळा घटाटे येथे गावा अंतर्गत सिमेंट रस्ते बांधकाम करीता रु.२५ लक्ष, खंडाळा घटाटे येथे हनुमान मंदिर जवळ सभामंडप बांधकाम करायला रु.१० लक्ष, व खंडाळा घटाटे येथे आरोग्य केंद्र ते भाऊराव चौधरी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बंधारे रु.१० लक्ष, तसेच खंडाळा घटाटे येथे बसस्थानक ते हनुमान पडोळे यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली बांधकाम करण्यासाठी रु.५ लक्ष अश्या अनेक विविध विकास कामांचे भूमिपूजन थाटात पार पडले.
या प्रसंगी प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे, पंचायत समिती सदस्य नरेश मेश्राम, ग्राम पंचायत सरपंचा विमलाताई बोरकुटे, उपसरपंच चेतनजी कुंभलकर, सदस्य रवींद्र केने, सौ.वर्षाताई नागपुरे, सविताताई तेलोते, मनीषाताई हटवार, स्वप्निल बोरकुटे, अतुल हजारे, प्रेमदासजी धरमारे, यादोरावजी कुंभलकर, दिलीप हटवार, शंकरजी वानखेडे, ताराचंदजी नागपुरे, नारायणजी हटवार, नितीनजी पानतावणे, आशिषजी वानखेडे, प्रमोदजी केजरकर, जिवनजी वानखेडे, देवाजी नागपुरे, महादेवजी नागपुरे, नितेशजी तेलोते, सप्नीलजी धरमारे, गोपालजी राऊत, हर्षलजी धरमारे, आकाशजी राऊत, राजेशजी हटवार, देवरावजी धरमारे, सौ वैशाली उके, सौ वैशाली चांद्रिकापुरे, सौ.संगीता चौधरी, सौ.कलावतीबाई तेलोते आणि समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंच चेतन कुंभलकर यांनी आशिषजी जयस्वाल साहेब यांचे संपूर्ण खंडाळा (घ) गावाचा वतीने आभार मानले.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या