चक्रवती सम्राट अशोक यांची जयंती दिनांक 29-3-2023 ला वंचित बहुजन आघाडी द्वारे साजरी
कन्हान :-सम्राटाचे सम्राट चक्रवती अशोक सम्राट यांची जयंती आज दिनांक 29-3-2023 ला वंचित बहुजन आघाडी शाखा-कन्हान शहर चा विध्यमाने मोठया उत्सहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडी चे सदस्य फार मोठया प्रमाणात उपस्थित झाले, कार्यक्रमाची अध्यक्षता स्वप्नील विनायक वाघधरे यांनी केली. तसेच वंचित बहुजन आघाडी रामटेक विधानसभा नेते निशांतजी मोटघरे यांनी यावेळी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्यावर मोलाचे विचार प्रकट केले,
यानंतर वंचित आघाडी पारशीवणी तालुका श्री. चंद्रमणीजी पाटील यांनी सुद्धा मार्गदर्शन केले, तसेच कन्हान ऍड. मृणाल भेलावे, या प्रामुख्याने उपस्थित होत्या,यावेळी प्रामुख्याने कन्हान शहर अध्यक्ष नितेश मेश्राम, शहर प्रवक्ता रजनीश मेश्राम, राजेशजी सोमकुवर, मनोज गोंडाने, आनंद चव्हाणजी, हिमाशु वासे, मोंटू राऊत, सुशील कळमकर,अभय पाटील, निखिल चवरे, पियुष वाघधरे, आदित्य टेभूरणे,नारायण गजभिये,समाजसेवक अश्वमेघ पाटील, व इतर महिला कार्यकर्ते मोट्या प्रमाणात उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन श्री. सागर उके, तसेच आभार प्रदर्शन रजनीश (बाळा ) मेश्राम यांनी केले.
प्रतिनिधी:- ऋषभ बावनकर, कन्हान- नागपूर


0 टिप्पण्या