Advertisement

कन्हान येथे युवक काॅंग्रेस द्वारे केंद्र सरकारच्या हुकूमशाही विरोधात प्रदर्शन

कन्हान येथे युवक काॅंग्रेस द्वारे केंद्र सरकारच्या हुकूमशाही विरोधात प्रदर्शन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष व लोकसभेचे खासदार मा.राहुल गांधी यांना सुरतच्या कोर्टाने एका विषयावर दोषी ठरवुन दोन वर्षाची सजा सुनावल्याने व मा. राहुल गांधी यांची लोकसभेची सदस्यता रद्द केल्याचा विरोधात नागपुर जिल्हा युवक कॉंग्रेस द्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे केंद्र सरकार व मोदींच्या विरोधात मुर्दाबाद चे नारे आणि घोषणाबाजी करून विरोध प्रदर्शन करण्यात आला मा.राहुल गांधी यांना ही सजा केंद्र सरकार च्या दबावा मध्ये सुनावली आहे . या हुकुमशाही धोरणाचा विरोध करित केंद्र सरकार व नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा बाजी करून विरोध प्रदर्शन करण्यात आला .

या प्रसंगी नागपुर जिल्हा ग्रामिण युवक कॉंग्रेस अध्यक्ष मिथीलेश कान्हेरे व रामटेक विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष निखिल दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुर जिल्हा युवक कॉंग्रेस सचिव रोहित बर्वे व युवक कॉंग्रेस कार्यकर्ता अजय कापसिकर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे केंद्र सरकार व मोदींच्या विरोधात मुर्दाबाद चे नारे , घोषणाबाजी करून विरोध प्रदर्शन करण्यात आला. या प्रसंगी नागपुर जिल्हा ग्रामीण युवक कॉंग्रेस महासचिव गौरव भोयर , नगरसेवक मनिष भिवगडे , महेश धोगडे , सोहेल सय्यद , चेतन नांदुरकर , प्रफुल राऊत , दुर्गेश शेंदरे , आकाश दुबे , प्रशांत पटेल , मोनु गुप्ता , बाबु सय्यद , स्यामरण जॉर्ज , प्रज्वल मेश्राम , स्वप्नील चवरे आदी सह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या