Advertisement

वेकोलि च्या खासगी कंपन्या मध्ये स्थानिय युवकांना रोजगार देण्याची मागणी

वेकोलि च्या खासगी कंपन्या मध्ये स्थानिय युवकांना रोजगार देण्याची मागणी

टेकाडी ग्रा.पं सदस्य सतीश घारड यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान :- परिसरात वेकोली च्या तीन खुल्या कोळसा खदान आणि नियम धाब्यावर ठेवुन कार्य करत असलेल्या कोल वाशरी आहेत . ज्यांच्या कोळसा धुळी प्रदुषणाने सध्या टेकाडी सह इतर गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्य , शेतपिक या सारख्या इतर समस्याना सामोरे जावे लागत आहे . वेकोली अंतर्गत खासगी कंपनी मध्ये युवकांना रोजगार देण्यात यावा . तसेच शहरी पीएम आवास योजनेच्या धर्तीवर ग्रामीण भागात घरकुलाचा लाभ देण्यात यावा . अशी मागणी टेकाडी ग्रामपंचायत सदस्य सतीश घारड यांचा नेतृत्वात ग्रामस्थांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष व विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे .

वेकोलि खुल्या कोळसा खदान च्या कोळसा व मातीच्या धुळीमुळे ग्रामस्थांना डोळे जळणे , श्वास घेण्यास त्रास होणे , घशाचा संसर्ग झाल्याच्या तक्रारी सोबत वेकोली द्वारे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ब्लास्टिंगचा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे , ब्लास्टिंगणे स्थानिकांची घरे खिळखिळी होत चाललेली आहेत . ज्याच्या तक्रारी स्थानिय प्रशासनाला ग्रामस्थ सातत्या ने करत आहेत, मात्र वेकोली च्या आडमुठ्या धोरणा मुळे समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे . त्यातच भर म्हणुन तालुक्यात कुठलाही रोजगार उपलब्ध नसल्याने वेकोली मध्ये कोळसा उतखननासाठी खाजगी कंपण्या काम करित आहेत. ज्यात स्थानिय युवकांना डावले जात आहे . रोजगारा हवा असेल तर विशिष्ट राजकीय पुढाऱ्याची शिफारस असलेल्या युवकांना कामावर घेतल्या जात आहे , अश्यात ज्या युवकांच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त नाही . अश्या युवकांना नाईलाजा स्तव वेस्टज कोळसा गोळा करण्याचे काम करावे लागत आहे .

मात्र त्यातही वेकोलि द्वारे गुन्हे दाखल करून बेरोजगार युवकांना मानसिक त्रास देण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने स्थानिय युवक आणि ग्रामस्थ वेकोलि मुळे बेजार झाले आहेत . ज्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी टेकाडी ग्रामपंचायत सदस्य सतीश घारड यांच्या नेतुत्वात स्थानिक ग्रामस्थांनी विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन केली आहे . तसेच शासनाने ग्रामीण भागाला एक लाख वीस हजार तर शहरी भागाला बहुमजली इमारत बांधण्याची परवानगी सह दोन लाख चाळीस हजार रुपयाचे अनुदान घरकुल उभारणी करिता दिले जाते. बांधकाम साहित्याच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत . अश्यात ग्रामिण भागातील लाभार्थ्यांनी तुटपुंज्या अनुदानात आपलं स्वप्नांचं घर कस उभं करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे . शहरी भागाला असलेला घरकुल नियम समसमान निधी ग्रामीण भागातील सभासद करिता सुद्धा लागु करून ग्रामीण भागात बहुमजली इमारत घरकुल योजने अंतर्गत बांधण्याची परवानगी शासनाने द्यावी अशी देखील मागणी केली आहे . यावेळी स्थानिय नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या