Advertisement

पारशिवनी येथे १८ मार्च ला स्वयंरोजगार शिबीरा चे आयोजन

पारशिवनी येथे १८ मार्च ला स्वयंरोजगार शिबीरा चे आयोजन

जास्तीत जास्त नागरिकांनी शिबीराचा लाभ घ्यावा चंद्रपाल चौकसे यांचे नागरिकांना आव्हान

कन्हान-चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे जिल्हा उद्योग केंद्र, कौशल्य विकास विभाग, खादी ग्रामोद्योग मंडळ, आदिवासी विकास महामंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत स्वयंरोजगार शिबीराचे आयोजन शनिवार दिनांक १८ मार्च ला सकाळी १०:०० वाजता पारशिवनी सरपंच भवन, सावनेर रोड येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक सुनील केदार, माजी कॅबीनेट मंत्री व आमदार सावनेर विधानसभा यांच्या हस्ते करण्यात येणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, पर्यटक मित्र, संस्थापक, रामधाम तिर्थ मनसर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन सौ.रश्मी बर्वे, माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद नागपुर, राजूभाऊ कुसुंबे, सभापती शिक्षण व वित्त विभाग जि.प. नागपूर, नरेश बर्वे, नगरसेवक, नगर परिषद कन्हान, सौ.मंगला निंबोने, सभापती पंचायत समिति पारशिवनी, सौ.मीना कावळे, सदस्य पंचायत समिति पारशिवनी, सौ.निकीता भारद्वाज, सदस्य पंचायत समिति पारशिवनी, प्रकाश डोमकी, माजी सरपंच पारशिवनी, राहुल सोनवने, पोलीस निरीक्षक पारशिवनी, श्रीधर झाडे, जिल्हा महासचिव काँग्रेस कमेटी नागपूर, दयाराम भोयर तालुका अध्यक्ष काँग्रेस कमेटी पारशिवनी, कु.करुणा भोवते, उपसभापती पंचायत समिति पारशिवनी, सौ.अर्चना भोयर, सदस्य जिल्हा परिषद नागपूर, सौ.तुलसी दियेवार, सदस्य पंचायत समिति पारशिवनी, चेतन देशमुख, सदस्य, पंचायत समिति पारशिवनी, कस्तूरचंद पालीवाल, अध्यक्ष, नरेंद्र जिनिंग प्रेसिंग पारशिवनी, सुभाष जाधव, गटविकास अधिकारी, पंचायत समिति पारशिवनी, संदीप भलावी, सदस्य पंचायत समिति पारशिवनी, राजेश यादव शहर अध्यक्ष काँग्रेस.कमेटी. कन्हान शहर, अशोक चिखले, जिल्हाध्यक्ष सहकार सेल, प्रशांत सांगडे तहसीलदार, पारशिवनी सह आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.

या शिबीरात सर्व तरुण युवक, युवती, महिला, शेतकरी, शेतमजुर सह आदि नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहुन शिबीराचा लाभ घेण्याचे आव्हाहन चंद्रपाल चौकसे यांनी केले.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या