पारशिवनी येथे स्वयंरोजगार शिबीर मोठ्या उत्साहात थाटात संपन्न
या पुढे सुद्धा असेच रोजगार प्राप्ती साठी मदत करत राहणार – मा.चंद्रपाल चौकसे
युवक, युवती, शेतकरी सह अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन घेतला शिबीराचा लाभ
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे जिल्हा उद्योग केंद्र, कौशल्य विकास विभाग, खादी ग्रामोद्योग मंडळ, आदिवासी विकास महामंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत शनिवार (दि.१८) मार्च ला सकाळी १० वाजता स्वयंरोजगार शिबीराचे आयोजन पारशिवनी सरपंच भवन, सावनेर रोड येथे करण्यात आले.
या भव्य शिबीर कार्यक्रमाचे उद्घाटक मा.सुनील केदार, माजी कॅबीनेट मंत्री व आमदार सावनेर विधानसभा यांचा शुभहस्ते करण्यात आले. या स्वयंरोजगार शिबीर मेळाव्यात पारशिवनी तालुक्यातील शेतकरी, युवक, युवती, शेतमजूर सह अनेक नागरिकांनी हजारो च्या संख्येत उपस्थित राहुन स्वयंरोजगार कोणत्या पद्धतीने करायचा या विषयी माहिती घेतली.
शिबारात मा.चंद्रपाल चौकसे यांनी स्वयंरोजगार उभारण्याकरिता अडचण निर्माण झाल्यास मंडळा मार्फत मदत करण्याचे सांगितले, तालुक्यात उच्च शिक्षित युवक युवती आहेत पन त्यांचा हाती काम नाही, शेतकरी यांचा कडे जोडधंदा नाही म्हणून स्वयंरोजगार मार्फत आपण सर्वाना हाताला काम मिळाव म्हणून ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या पुढे सुद्धा असेच रोजगार प्राप्ती साठी मदत करत राहणार. शिबीरात वेगवेगळ्या विभागाचे मार्गदर्शक प्रामुख्याने उपस्थित होते. एस.पी पाटील जिल्हा ग्रामउदयोग नागपूर, एन.पाटील वेवस्थापक जिल्हा उदयोग केंद्र नागपूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले मार्गदर्शन केले.
या स्वयंरोजगार शिबीर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. चंद्रपालजी चौकसे, अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक, प्रमुख पाहुणे मा.श्रीधर झाडे, महासचिव नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी, सौ. रश्मिताई बर्वे, माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद नागपुर व सदस्या जिल्हा परिषद नागपुर, सौ.अर्चना भोयर, सदस्या जिल्हा परिषद नागपुर, मा.दयाराम भोयर, तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमेटी पारशिवणी, सौ. मंगलाताई निंबोने, सभापती, पंचायत समिति पारशिवणी, कु. करुणाताई भोवते, उपसभापती, पंचायत समिति पारशिवणी, सौ. मीनाताई कावळे, सदस्य पंचायत समिति पारशिवनी पारशिवणी, मा.चेतन देशमुख, सदस्य पंचायत समिति पारशिवणी, सौ. तुलसी दियेवार, सदस्य पंचायत समिति पारशिवणी, मा.संदीप भेलावी सदस्य पंचायत समिति पारशिवणी, मा.अशोक चिखले, जिल्हाध्यक्ष सहकार सेल, मा. एस.पी. पाटील जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नागपुर, मा.पाटील साहेब मॅनेजर जिल्हा उद्योग केंद्र नागपुर सह आदि मान्यवर प्रमामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्रीधर झाडे यांनी केले. सुत्र संचालन मा.खुशाल कापसे सर यांनी केले व आभार प्रदर्शन मा.निखिल पाटील यांनी केले.
या प्रसंगी शिवहरी भड, वीरेंद्र गजभिये, शालिक ढोंगे, देविदास जामदार, जिवलग चव्हाण, खेमराज दळणे, धर्मेंद्र दुपारे, प्रदीप दियेवार, कमलाकर कोठेकर, सौ.शोभाताई ढोणे, प्रेम कुसुंबे, सौ.माया गोरले, सौ. विद्याताई चिखले, सचिन आमले, राजू ठाकुर, मीनाताई येवले, रक्षणाताई गजभिये, मोहन सहारे, आकाश पंधरे सह युवक, युवती, महिला, शेतकरी, शेतमजुर सह आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या