Advertisement

पिपळा येथे युवा सेना शाखेचे उद्घाटन

पिपळा येथे युवा सेना शाखेचे उद्घाटन

नितेश दुधके शाखा प्रमुख , प्रफुल शिवार उपशाखा प्रमुख , साहील धोंगडे यांची समन्वय प्रमुख पदी निवड

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – पारशिवनी तालुक्यातील पिपळा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित युवासेना शाखेचे उद्घाटन रामटेक विधानसभा क्षेत्राचे प्रमुख मा.विशाल बरबटे यांचा मार्गदर्शनात जिल्हा प्रमुख लोकेश बावनकर , उपजिल्हा प्रमुख समीर मेश्राम , तालुका प्रमुख अभिषेक एकुणकर यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले .

मंगळवार दिनांक २१ मार्च ला पिपळा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित युवासेना शाखेचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित युवासेना जिल्हा प्रमुख लोकेश बावनकर , उपजिल्हा प्रमुख समीर मेश्राम , तालुका प्रमुख अभिषेक एकुणकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करीत कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . कार्यक्रमात युवासेना जिल्हा प्रमुख लोकेश बावनकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि “जय भवानी जय शिवाजी , उद्धव ठाकरे साहब आगे बढो हम तुम्हारे साथ है” अश्या घोषणा देऊन शाखेचे उद्घाटन करण्यात आले . यावेळी नितेश दुधके यांची शाखा प्रमुख , प्रफुल शिवार यांची उपशाखा प्रमुख , साहील धोंगडे यांची समन्वय प्रमुख पदावर निवड करण्यात आली .

या प्रसंगी लोकेश शिवारे , राकेश दुधके , श्याम मेश्राम , सागर शिवारे , राहुल दुधके , शुभम ढेंगरे , संदीप ढेंगरे , नंदकिशोर एकुणकर , हर्षल कडू , हर्ष आमले , रोशन शिवारे , सुनील खंडाते , प्रज्वल कुटे , पियुष बारमाटे , नीलकंठ दुधके सह आदि युवा शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या