Advertisement

आम आदमी पक्ष तालुकाध्यक्ष पदावर ज्ञानेश्वर दारोडे यांची नियुक्ती

आम आदमी पक्ष तालुकाध्यक्ष पदावर ज्ञानेश्वर दारोडे यांची नियुक्ती

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – आम आदमी पक्ष नागपुर द्वारे पारशिवनी तालुक्यातील सावली , दहेगाव येथे आम आदमी पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले . सावळी येथील कार्यक्रमात आम आदमी पक्ष तालुकाध्यक्ष पदावर कन्हान येथील रहिवासी ज्ञानेश्वर दारोडे यांची नियुक्ती करण्यात आली .

बुधवार (दि.२२) मार्च ला आम आदमी पक्षा द्वारे खापरखेडा व पारशिवनी तालुक्यातील सावळी , दहेगाव येथे आम आदमी पक्ष विदर्भ संचालक देवेंद्र वानखेडे यांच्या हस्ते आम आदमी पक्षाच्या कार्यालया चे उद्घाटन करण्यात आले . या प्रसंगी सावळी येथील कार्यक्रमात आम आदमी पक्ष पारशिवनी तालुकाध्यक्ष पदावर कन्हान चे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर दारोडे यांची नियुक्ती करण्यात आली . यावेळी शंभर पेक्षा जास्त कार्यकर्त्यानी आम आदमी पक्षा मध्ये प्रवेश केला . ज्ञानेश्वर दरोडे यांनी सांगितले की, लवकरच कन्हान , कांद्री , टेकाडी , गोंडेगाव व पारशिवनी सह संपुर्ण रामटेक विधानसभेच्या प्रत्येक गावात ‌शाखा उघडण्यात येईल . २०२४ मध्ये पंजाब व दिल्ली प्रमाणे नागरिकांच्या मुलभुत गरजा पुर्ण करण्यास महाराष्ट्रात ही आम आदमी पक्ष वाढविण्याचे तत्पर आहे . रामटेक विधानसभे ला नवा विचार, नवी दिशा हवी असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने आम आदमी पक्षात प्रवेश घ्यावा . असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमा चे सुत्रसंचालन गणेश रेवतकर यांनी तर आभार ईश्वर गजभे यांनी मानले .

कार्यक्रमास आम आदमी पक्षाचे मंत्री कादिर सय्यद , एहसान खान , माधव गोरले , गणेश काकडे , बबलु युके , विष्णु वानखेडे , चक्रधर उकुंडे , केशव पोकडे , दिनेश बरबटे सह आदि मोठ्या संख्येत कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या