नयाकुंड शिवारात कोळसा ट्रक ची दुचाकी वाहना ला धडक, एकाचा मृत्यु , तर एक जख्मी
पारशिवनी पोलीस स्टेशन ला ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान – पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत नयाकुंड शिवारात कोळसा च्या ट्रक चालका ने दुचाकी वाहना ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यु झाला असुन एक युवक जख्मी झाला आहे .
मिळालेल्या माहिती नुसार रविवार (दि.१९) मार्च ला दुपारी २:३० ते ३:00 वाजता दरम्यान नयाकुंड येथील अशोक रामदयाल अवस्थी वय ६५ वर्ष व मुलगा सुमित अशोक अवस्थी हे दोघे वडील मुलगा आपल्या शेतात काम करित असतांना अचानक वादळ वारा व आकाशात काळेकाळे ढग आल्याने जोरदार पावसाच्या भितीने काम आटोपुन आपल्या दुचाकी क्र एम एच ४० बी.जे १९८२ ने घरी परत येतांना नयाकुंड शिवारात ढाब्याच्या मोड रस्त्यावर आमडी फाटा कडुन पारशिवनी कडे जाणाऱ्या कोळसा भरलेला ट्रक क्र एम एच ४० – बी.एल २३१६ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन दुचाकीला जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी सह दोघे खाली पडल्याने अशोक अवस्थी यांच्या कमरे वरून ट्रक चे चाक गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मुत्यु झाला तर दुसरी कडे पडलेल्या मुलगा सुमित अवस्थी हा जख्मी झाला .
सदर प्रकरणा बाबत पारशिवनी पोलीसांनी सुमित अवस्थी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सोनवाने यांचा मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक विनायक नागुलवार करित आहे .
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
0 टिप्पण्या