Advertisement

कन्हान नदी पात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

कन्हान नदी पात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पिपरी शिवार येथील कन्हान नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळुन आल्याने कन्हान पोलीसांनी मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार (दि.२१) मार्च ला दुपारी १२३० ते १२४५ वाजता च्या दरम्यान पोस्टे ला फोन द्वारे माहिती मिळाली कि एक इसम कन्हान नदी चे पात्रात बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे.  अश्या माहिती वरुन प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर,

सहायक फौजदार सुर्यभान जळते, सदाशिव काटे, अलिम खान, शालीकराम महाजन, सह आदि कर्मचारी सरकारी वाहना ने कन्हान नदी पात्रात जाऊन पाहणी केली असता

एक अनोळखी इसम वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष हा बेशुद्ध अवस्थेत पडुन असल्याचे दिसल्याने पोलीसांनी त्यास हलविन्याचा प्रयत्न केला असता कोणत्याच प्रकारचा प्रतीसाद मिळाला नाही.

सदर अनोळखी इसम हा बेशुद्ध अवस्थेत दिसुन आल्याने त्यास पोलीसांनी पोस्टे स्टाफ आणि लोकांचे मदतीने उचलून सरकारी वाहाना ने मेयो हॉस्पीटल नागपुर येथे उपचारा कामी नेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासुन मृत घोषीत केले.

कन्हान पोलीसांनी त्यास मेयो हॉस्पीटल नागपुर येथील मर्क्युरी बी-6 बॉक्समध्ये येथे दाखल केले.

सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी सहायक फौजदार सुर्यभान जळते यांचा तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग क्र १०२३, कलम १७४ जा.फौ अन्वये गुन्हा दाखल करून

पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांचा मार्गदर्शनात सहायक फौजदार सुर्यभान जळते हे करीत आहे.

सदर अनोळखी इसमाचे वर्णन

सदर इसमाची उंची ५.५ इंच बांधा सळपातळ अंगात निळ्या फिकट रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाचा पॅन्ट, डाव्या हातावर होलीराम असे नाव गोंदलेले असून, दाढी- पांढरी वाढलेली मिशी काळी पांढरी,

डोक्याचे केस काळे पांढरे वय अंदाजे ४० ते ४५ असे असून मृतकाची नातेवाईक यांचा शोध सुरु असुन अध्यापही मृतकाची ओळख पटली नसुन

सदर अनोळखी इसम हा एकाकी वाटत असुन त्याचाजवळ त्याची ओळख पटनेकरीता कोणतेही कागदपत्र चिट्टी मिळुन आली नाही. त्याला अन्न व पाणी न मिळाल्याने तो मरण पावला असावा किंवा

कोणत्यातरी अज्ञात कारणाने मरण पावला असावा. तरी ओळखत असल्यास तात्काळ कन्हान पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावे असे आव्हाहन कन्हान पोलीस विभागाने केले आहे.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या