कोरोमंडल फर्टिलाइजर्स व्दारे आरोग्य शिबीर संपन्न
१५० कामगार आणि स्थानिक नागरिकांनी घेतला शिबीराचा लाभ
कन्हान – कोरोमंडल फर्टिलाइजर्स लिमिटेड, इंपैक्ट गुरु फाउंडेशन व राजकुमार गुलाटी ट्रांसपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कन्हान रेल्वे माल धक्का येथिल निशुल्क आरोग्य तपासणी शिबीराचा १५० कामगार व परिसरातील नागरिकांनी लाभ घेत शिबीर कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
कोरोमंडल फर्टिलाइजर्स लिमिटेड, इंपैक्ट गुरु फाउंडेशन व राजकुमार गुलाटी ट्रांसपोर्ट यांच्या व्दारे रेल्वे माल धक्का कन्हान येथे इंपैक्ट गुरु फाउंडेशन चे दुर्गेश बिसेन यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित आरोग्य शिबीराची सुरूवात करून डॉक्टरांनी मधुमेह, रक्तदाब, डोळे, नाक, गळा आदी संबंधी विविध प्रकारच्या तपासणी करून रूग्णाना निशुल्क औषधी वितरण करण्यात आल्या.
या शिबीरा मध्ये १५० कामगार आणि स्थानिक नागरिकांनी लाभ घेतला. यामुळे वेळो वेळी अश्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केल्यास येथील गरजु लोकांना शिबीराचा लाभ घेता येईल असे नागरिक चर्चेतुन भावाना व्यक्त करित होते.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या