आज पासून कशाळ मध्ये श्रीराम जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ
वडगाव मावळ/pune : वडगाव मावळ कशाळ येथे चैत्र शुद्ध १ पासून नवीन हिंदू वर्षापासुन श्रीराम जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाचे आजपासून प्रारंभ झाला आहे. गेल्या ४७ वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह गावामध्ये होत असून या सप्ताहाला अनेक नामांकित कीर्तनकार प्रवचनकार लाभले आहेत.
सालाबाद प्रमाणे यावर्षीही श्रीराम जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह बुधवार दिनांक २२ मार्च २०२३ पासून ते शुक्रवार ३१ मार्च २०२३ पर्यंत होणार आहे. या मध्ये अखंड विनानाद पहाटे काकड आरती, विष्णुसहस्रनाम, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीराम नामजप, गाथा भजन, हरिपाठ, प्रवचन, हरिकीर्तन, स्नेहभोजन हरीजागर इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणें प्रवचनरुपी सेवा अनुक्रमे ह.भ.प.काळुराम जगताप, ह.भ.प.रामकृष्ण जाधव, ह.भ.प.रामदास जोरी,ह.भ.प.नंदाराम जाधव,ह.भ.प.प्रकाश घुले,ह.भ.प.खंडू जाधव, ह.भ.प.विकास खांडभोर, ह.भ.प.पांडुरंग गायकवाड,ह.भ.प.किरण काहूर यांची सेवा होणार आहे.
तसेच किर्तनरूपी सेवा अनुक्रमे ह.भ.प.दिनेश जाधव, ह.भ.प.संजय शेट्टी, ह.भ.प.मंगेश शिंदे,ह.भ.प.निवृत्ती मुके,ह.भ.प.ज्ञानेश्वर तळेकर,ह.भ.प ज्ञानेश्वर ठाकर, ह.भ. प. विष्णू मिर्धे ह.भ.प.दशरथ मानकर, ह.भ.प.किसन धंद्रे यांचे सेवा होईल.
दिनांक ३० मार्च रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प.रोहिदास धनवे यांचे श्रीराम जन्माचे किर्तन होईल. त्याचप्रमाणें दिनांक ३१ मार्च रोजी सकाळी १० ते १२ वाजता ह.भ.प.शंकर मराठे यांचे काल्याचे किर्तन होईल.
कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह समिती, श्री वनदेव ढोल लेझीम मंडळ, शिवशक्ती ढोल लेझीम मंडळ, मळुबाई प्रतिष्ठान, समस्त ग्रामस्थ यांनी केलं आहे.
मावळ तालुका प्रतिनिधी-सुखदेव जाधव
0 टिप्पण्या