कन्हान पोलीस स्टेशन येथे शांतता समितिची बैठक संपन्न
सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आव्हाहन
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन येथे येणारे सण उत्सवा निमित्य शांतता समिति ची बैठक आयोजित करुन येणारे सण उत्सव शासनाच्या नियमानुसार शांततेत साजरे करण्यात यावे. असे आव्हाहन पोलीस प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना केले आहे.
शनिवार (दि.२५) मार्च रोजी सकाळी ११ वाजता पोलीस स्टेशन कन्हान येथे सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम यांचा प्रमुख उपस्थितीत शांतता समिती ची बैठक घेऊन पुढे येणारे श्रीराम नवमी,
महाविर जयंती, हनुमान जयंती, ईस्टर डे, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आदि सण उत्सव सामाजिक बांधिलकी जपत सर्वधर्म समभावाची जोपासना करित शासनाच्या नियमानुसार शांततेत साजरे करण्यात यावे. असे आव्हाहन पोलीस प्रशासना व्दारे सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना करण्यात आले.
या प्रसंगी कॉंग्रेस कमेटी पारशिवनी तालुकाध्यक्ष मा. दयाराम भोयर, नप नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर, नगरसेविका संगीता खोब्रागडे, विनायक वाघधरे, भगवान नितनवरे, जेष्ट पत्रकार एन एस मालविये सर, कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. मोतीराम रहाटे सह आदि मान्यवर उपस्थित होते.
सण उत्सव साजरे करतांना स्थानिय ग्रामपंचायत, नगरपरिषद व पोलीस प्रशासनाची पुर्व परवानगी घेण्यात यावी. आक्षेपार्ह बँनर, पोस्टर लावण्यात येऊ नये, चुकीच्या घोषणा, नारे लावु नये, डिजे वाजविण्यास बंदी असल्याने ५० डेसी च्या वर डिजे वाजवु नये.
अन्यथा नियमाचे पालन न केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल आणि रात्री १० वाजता पर्यंतच कार्यक्रम साजरा करण्यात यावा. कार्यक्रमास कुठलेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन शासन नियमाचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.
सण, उत्सव साजरे करतांना कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम यांनी या बैठकीत मार्गदर्शन करतांनी सांगितले.
शांतता समिती बैठकीस पत्रकार सुर्यभान फरकाडे, कमलसिंह यादव, सुनिल सरोदे, ऋषभ बावनकर, सतिश घारड, भारत पगारे, दिनेश नानवटकर, जयंत कुंभलकर, पोलिस पाटील पुंडलिक कुरडकर, सुरेश काकडे, गुंडेराव चकोले, धनराज चकोले, पुरुषोत्तम दोडके, संतोष ठाकरे, संदीप नेऊल, संजय नेवारे, श्रीकृष्ण कुथे, ईश्वर राऊत गडे, शालु घरडे, सामाजिक कार्यकर्ते निशांत मोटघरे,
प्रशांत वाघमारे, मनिष भिवगडे, प्रशांत मसार, दिपक तिवाडे, चंदन मेश्राम, अरविंद गजभिये, मनोज गोडाणे, रंजनिश मेश्राम, अभय हेटे, हेमंत गिऱ्हे, सुनिल शेंडे, रोहित आंबागडे, अभिजित चांदुरकर, उमेश पौनिकर, सुतेश मारबते, देवेंद्रसिंह सेंगर, उपासराव खोब्रागडे सह शांतता समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या