दोन लोखंडी पोल आणि अल्युमिनियम तार सह एक लाख तीस हजार रुपयांची चोरी
वाघधरे वाडी येथील घटना. पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान परिसरात आणि ग्रामीण भागात चोरट्यांचा बोलाबाला दिवसेन दिवस वाढत असुन वाघधरे वाडी येथील गोपाल अग्रवाल यांचे शेता पासुन खंडाळा पर्यंत चे दोन लोखंडी इलेक्ट्रीक पोल व
अॅल्युमिनियम चे तार कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी प्रल्हाद ओमकार यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे.
कन्हान येथील राहणारे विनोद यादव यांचे शेत व गोठ फार्म वाघधरे वाडी शिवारात आहे. गुरुवार (दि.१६) मार्च ला दुपारी ३:०० वाजता च्या दरम्यान विनोद यादव रा.गवलीपुरा कन्हान यांनी
प्रल्हाद बुध्दुलाल ओमकार वय ३८ वर्ष रा.हनुमान नगर कन्हान यांना फोन करुन सांगितले कि गोपाल अग्रवाल यांचे शेतापासुन ते खंडाळा पर्यंत इलेक्ट्रीक पोल आणि त्यावरील अल्युमीयम चे तार चोरी गेल्याचे दिसुन येत आहे.
अश्या माहिती वरुन प्रल्हाद ओमकार त्याच दिवशी सायंकाळी ४:३० वाजता च्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गोपाल अग्रवाल यांचा शेता जवळुन गेलेली लोखंडी पोल वरुन खंडाळा रोड कडे तीन पदरी अल्युमीयम च्या ताराची लाईन खंडाळा रोड पर्यंत दिसुन आली नाही.
तसेच दोन लोखंडी इलेक्ट्रीक पोल जमीनी पासुन अर्धा फुट अंतरावर कापुन नेल्याचे दिसुन आले व दोन पोल वाकलेले दिसुन आले.
बुधवार (दि.१५) मार्च चे रात्री ८ वाजता ते गुरुवार (दि.१६) मार्च चे दुपारी ३ वाजता च्या दरम्यान दोन लोखंडी इलेक्ट्रीक पोल किंमत ३०,००० रुपए व अॅल्युमिनियम तार तीन हजार फुट किंमत १,०३,००० रुपए असा एकुण १,३३,००० रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी प्रल्हाद ओमकार यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्रमांक १२४२३ कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.


0 टिप्पण्या