एस.ई.सी.एल.स्वतंत्र संचालक पद्दी अँड गजानन आसोले यांची नियुक्ती
कन्हान – एस.ई.सी.एल.संचालक बोर्डाची दिल्ली येथे संपन्न झालेल्या ३३५ व्या बैठकीत नविन नियुक्त स्वतंत्र संचालक ॲड.गजानन देवरावजी आसोले यांचे एस.ई.सी.एल.चे अध्यक्षा सह पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून स्वागत केले.
जुनी कामठी येथील रहिवासी माजी आमदार स्व.देवरावजी आसोले यांचे पुत्र ॲड.गजानन देवरावजी आसोले यांची नुकतीच एसईसीएल स्वतंत्र संचालक पद्दी नियुक्ती करण्यात आली.एसईसीएल संचालक बोर्डाची दिल्ली येथे संपन्न झालेल्या ३३५ व्या बैठकीत नव नियुक्त स्वतंत्र संचालक ॲड.गजानन देवरावजी आसोले यांचे एस.ई.सी.एल.चे अध्यक्ष प्रबंध निदेशक डॉ.पी.एस.मिश्रा यांनी पुष्पगुच्छदे़ऊन अभिनंदन केले.
तसेच स्वतंत्र संचालक सी.एस.डॉ.श्याम अग्रवाल यांनी सुध्दा अभिनंदन करून स्वागत केले.तसेच स्वतंत्र संचालक अँड.गजानन देवरावजी आसोले यांची नियुक्ती सदस्य म्हणुन एस.ई.सी.एल.च्या लेखा ऑडीट समिती, सी.एस.आर समिती व रिस्क मॅनेजमेंट समिती वर सुध्दा करण्यात आली आहे.
यावेळी एस.ई.सी.एल चे सर्व संचालक श्री.एस.के.पाल, संचालक तांत्रिक श्री.जी.श्रीनिवास, संचालक वित्त श्री.एस.एन.कापरी, संचालक तांत्रिक ( योपरी ) श्री.देबाशिष आचार्य, संचालक तांत्रिक (कार्मिक) श्री.भवानी प्रसाद पति, संयुक्त सचिव कोयला मंत्रालय श्री.बी.विरा रेड्डी, संचालक तांत्रिक (कोल इंडीया ) स्वतंत्र संचालक सी.एस.डॉ.श्याम अग्रवाल, स्वतंत्र संचालक श्री.टंकाधर त्रिपाठी, एस.ई.सी.एल.चे कंपनी सचिव श्री.स्वप्निल सुधांशु आदिंनी प्रामुख्याने उपस्थित राहुन अभिनंदन केल्याबद्दल नव नियुक्त स्वतंत्र संचालक ॲड.गजानन आसोले हयानी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यकत केले.
एस.ई.सी.एल.स्वतंत्र संचालक पद्दी अँड गजाननन आसोले यांची नियुक्ती करण्यात आल्याने वेकोलि कामठी, इंदर, गोंडेगाव खुली कोळसा खदान व कन्हान परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या