कन्हान शहर विकास मंच द्वारे शहिदांना दिली श्रद्धांजली
कन्हान – इ.स.वी.सन २३ मार्च १९३१ साली लाहोर जेल मध्ये भगत सिंह, शिवराम राजगुरु आणि सुखदेव थापर यांना फाशी देण्यात आली होती.
या दिवशी त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात २३ मार्च हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.
कन्हान शहर विकास मंच द्वारे २३ मार्च शहिद दिवस निमित्य श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन तारसा शहिद चौक येथे करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शहर विकास मंच नवनिर्वाचित सदस्य वसंतराव उरकुडे, मार्गदर्शक ताराचंद निंबाळकर यांच्या हस्ते शहिद प्रकाश देशमुख, भगत सिंह, शिवराम राजगुरु, सुखदेव थापर यांचा प्रतिमेला आणि शहिद स्मारका वर पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमात मंच मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे सह आदि ने शहिद दिवसा वर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी शहिद स्मारक व शहिदांचा प्रतिमेला पुष्प अर्पित केले आणि दोन मिनटाचा मौन धारण करुन शहिदांना श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली.
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे, ताराचंद निंबाळकर, संदीप देशमुख, हरीओम प्रकाश नारायण, प्रकाश कुर्वे, शाहरुख खान, वसंतराव उरकुडे, योगराज आकरे, काशीनाथ कोंडेवार सह आदि मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या