Advertisement

आपसी भांडणात कंपाऊंड भिंतीचे विटा-टाईल्स चे तुकडे रोडवर फेकुन केले नुकसान

आपसी भांडणात कंपाऊंड भिंतीचे विटा,टाईल्स चे तुकडे रोडवर फेकुन केले नुकसान

कन्हान  – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत स्वामी विवेकानंद नगर येथील रहिवासी बावने परिवारात आपसी भांडणात भासऱ्याने लगत च्या लहान भावानी बांधलेल्या कंपाऊड भितीं च्या विटा फेकुन, टाईल्स तुकडे रोडवर फेकुन भासरा व त्यांच्या मुलाने कडप्पे रोडवर फेकुन नुकसान करुन दोंघानी शिविगाळ करित पोलीस स्टेशन ला तक्रार दिल्यास पाहुन घेण्याची धमकी दिल्याने सविता बावने हिने  पोलीस स्टेशन गाठुन तक्रार केली .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार (दि.१५) मार्च ला सौ. सविता प्रदिप बावणे वय ३६ वर्ष व १) सुरेश बावणे २) सागर सुरेश बावने सर्व रा.विवेकानंद नगर कन्हान हे सुन आणि भासरे नातेवाईक असुन एक दुसऱ्यांचे घरालगत राहतात . सौ.सविता बावने यांचे घराचे बांधकाम सुरु असुन दोघांच्या घराचे मधोमधी आपले हिस्याचे जागेवर कंपाऊड वाल चे बांधकाम केले आहे. घटनेच्या वेळी सौ सविता बावने हि घरी हजर असतांनी गैरअर्जदार क्र.१) सुरेश बावणे यांनी भिंतीस लावलेल्या वीटा उचलुन रोडवर फेकल्या व टाईल्सचे कापलेले तुकडे सुद्धा रोडवर फेकुन म्हणाला कि,तुझ्या बापाची जागा आहे का  तुझे बापाचे घर होय काय  दिवाल बनवत आहे.

असे बोलुन शिवीगाळ करू लागल्याने सविता हिने म्हटले कि,मी माझ्या घरा समोरच भिंत बांधली. तेव्हा गैर अर्जदाराचा मुलगा सागर हा तिथे आला व अंगणात ठेवलेले कडप्पे उचलुन खाली आपटुन तीन हजार रुपयाचे नुकसान केले आणि गैरअर्जदारा दोघांनी ही सविता ला शिवीगाळ करुन तु पोलीस स्टेशन ला कंम्पलेंन्ट केली तर तुला पाहुन घेईल अशी धमकी दिल्याने फिर्यादी सौ. सविता बावने यांनी पोस्टे ला तक्रार दिली. सदर प्रकरण अदखलपात्र स्वरुपाचे असल्याने कन्हान पोलीसांनी कलम ४२७ , ५०४ , ५०६ भादंवि अन्वये दाखल करून कोर्टात दाद मागण्याची समज दिली.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या