निर्दोष मृतक राहुल सलामे च्या परिवारा ला ५ लाखाची सहायता व पत्नीस नौकरी देण्याची मागणी
माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांचे मुख्यमंत्री शिंदे व गृहमंत्री फडणवीसांना निवेदन
कन्हान – कन्हान पोलीस प्रशासना ने तपासाकरिता ताब्यात घेतलेल्या निर्दोष मृतक राहुल पंचम सलामे ची प्रकृती बिघडुन उपचारा दरम्यान मृत झालेल्या आदिवासी राहुल सलामे च्या परिवारा ला तात्काळ मुख्यमंत्री साहयता निधीतुन ५ लक्ष रूपयाची सहायता करून त्यांच्या परिवारा च्या उदार्निवाह करिता त्याच्या विधवा पत्नीला शासकिय नौकरीत समाविष्ट करण्याची मागणी माजी आमदार मा.मल्लीकार्जुन रेड्डी यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री , गृहमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवुन केली आहे .
शुक्रवार (दि.३) फेब्रुवारी ला कन्हान राष्ट्रीय महामार्गा वरील आठवडी बाजारात तलवार बाजी प्रकरणी आरोपी खैलेश व शुभम सलामे ला न पकडता त्याच्या निर्दोष भाऊ राहुल सलामे ला कन्हान पोलीसांनी मध्यरात्री ३ वाजता त्याचे घरून ताब्यात घेत पोलीस स्टेशन ला आणुन तपास करित असतांना दुपारी त्यांची प्रकृती खराब झाल्याचे पोलीसांनी त्याचे पत्नी ला निरोप देऊन राहुल ला मेयो शासकीय रूग्णालय नागपुर ला उपचारा करिता भर्ती केले .
शुक्रवार (दि.१७) फेब्रुवारी ला आदिवासी राहुल सलामे चा उपचारा दरम्यान मृत्यु होऊन निर्दोषाचा नाहक बळी गेल्याने या प्रकरणातील तपास पोलीस अधिकारी , पोलीस कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी . तसेच मृतक राहुल सलामे ला दिड वर्षाची मुलगी असुन पत्नी बबली गरोदर असुन त्याचे आई वडिल वृध्द आहेत . राहुल सलामे हा गुन्हेगारी पाश्वभुमीचा नसुन तो परिवाराचा कर्ता वर्मा आधारस्तंभ पुरूष असल्याने त्याचे परिवाराला उदार्निवाह चा प्रश्न निर्माण झाल्याने कुंटुबावर उपासमारीची पाळी येऊ म्हणुन तात्काळ ५ लक्ष रूपये मुख्यमंत्री सहायता निधीतुन करून त्यांच्या पत्नीला शासकिय नौकरीत समाविष्ट करून आदिवासी समाजाल न्याय दयावा . अशी मागणी माजी आमदार मा.मल्लीकार्जुन रेड्डी यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री , गृहमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवुन केली आहे .
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या