Advertisement

नागपूर -जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कान्द्री चेक पोस्ट येथील RTO अधिकारी ५०० रुपयांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात

कान्द्री चेक पोस्ट येथील RTO अधिकारी ५०० रुपयांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात

एका अधिकाऱ्यासह दोन खासगी कर्मचारी देखील ACB च्या जाळ्यात

रामटेक:- नागपूर -जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कान्द्री चेक पोस्ट (महाराष्ट्र बॉर्डर) येथे सेवेवर कार्यरत असलेले आर.टी.ओ.अधिकारी यांनी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना अधिकारी व दोन खासगी कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्याकडून अटक करण्यात आले आहे.

आरोपी आर.टी.ओ. अधिकाऱ्याचे नाव अभिजित सुधीर मांजरे (वय ३९ वर्ष) पद. मोटार वाहन निरीक्षक यांच्यासह दोन खासगी इसम नामे. करण मधुकर काकडे (वय २८ वर्ष.) रा. हिवरा (बेंडे) ता.रामटेक जि.नागपूर, व विनोद महादेव लांजेवार (वय ४८ वर्ष.) रा.सुभाषनगर कामगार कॉलनी नागपूर, यांना अटक करण्यात आली आहे. ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्याकडून (दि.८ फेब्रुवारी) रात्री ९:00 वाजता करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, सदर तक्रारदार हे मालवाहू वाहन मनमाड ते रिवा येथे जात असताना मधात कान्द्री परिसरातील महाराष्ट्र चेक पोस्ट (बॉर्डर) येथे तक्रारदाराला चालान व्यतिरिक्त एन्ट्री करिता RTO अधिकाऱ्यांनी ५००/- रुपयांची मागणी केली व RTO अधिकारी अभिजित मांजरे यांनी लाच स्वीकारली.

सदर प्रकारचे कृत्य करण्यास आरोपी अधिकारी यांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आरोपी दोन्ही खासगी इसम कर्मचाऱ्यांना प्रवृत्त केले. त्याप्रकरणी त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ संशोधन २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून लाच घेतलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) नागपूर, व अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

ही कारवाई सापळा अधिकारी योगिता चाफले पोलीस उपनिरीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर), पोलीस निरीक्षक वर्षा मते, पोलीस निरीक्षक आशिष चौधरी, पोलीस निरीक्षक निलेश उरकुडे, पोलीस नायक अमोल मेंघरे, पोलीस नायक अनिल बहिरे यांनी केली.

प्रतिनिधी: पंकज चौधरी, बोरडा-रामटेक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या