कन्हान परिसरात आज पासुन महाशिवरात्रि महोत्सव निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान-कन्हान शहरात, परिसरात, आणि ग्रामीण भागात दरवर्षी महाशिवरात्रि महोत्सव विविध कार्यक्रमा सह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असुन या वर्षी सुद्धा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जुनी कामठी कामठेश्वर महादेव मंदिरात दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन
परिसरातील जुनी कामठी येथील कामठेश्वर महादेव मंदिरात श्री शिव मंदिर देवस्थान समिति द्वारे महाशिवरात्रि महोत्सव निमित्य दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
आज शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता पासून अखंड रामायणाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री उत्सवा निमित्त पहाटे ३ वाजता पासून श्री भगवान कामठेश्वर महादेवाला मा.प्रकाशजी सिरीया , मा.जयरामजी पारवानी यांच्या हस्ते अभिषेक करुन दर्शनाला सुरुवात होणार आहे.
रविवार दिनांक १९ फेब्रुवारी ला सकाळी ९ वार्ता पासुन
केजाजी महिला भजन मंडळ जुनी कामठी द्वारे गोपाल काला , सकाळी १०:३० वाजता पासून ह.भ.प. उमेश महाराज बहुरूपी (वरुड) यांचे कीर्तन कार्यक्रम , सकाळी ११:०० वाजता पासुन श्री शिव मंदिर देवस्थान समिति द्वारे आभार प्रदर्शन आणि दुपारी १ वाजता पासुन रात्री ९ वाजता पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे .
या सर्व कार्यक्रमाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री शिव मंदिर देवस्थान समिती द्वारे करण्यात आले आहे.
वराडा गावात महाशिवरात्रि महोत्सव निमित्य तीन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन
वराडा येथे जय शिव भोले पंच कमेटी वराडा द्वारे महाशिवरात्रि महोत्सव निमित्य तीन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
आज शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी ला सकाळी शिव महापुजन , भजन कार्यक्रम , दुपारी १२ वाजता शिवगौरी भजन मंडळ वराडा , दुपारी ३ वाजता हरीपाठ भजन मंडळ वराडा द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
रविवार दिनांक १९ फेब्रुवारी ला
दुपारी १२ वाजता शारदा महिला भजन मंडळ वराडा , दुपारी ३ वाजता बाल गणेशभजन मंडळ वराडा , सायंकाळी ८ वाजता शिव भजन मंडळ, वराडा, शिव भजन मंडळ वराडा तर्फे जागृती भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .
सोमवार दिनांक २० फेब्रुवारी ला दुपारी १ वाजता पासुन ते ३ वाजता पर्यंत ह. भ. प. सौ. सोनुताई भोले नरसाळा , ह. भ. प.श्री लोडेकर महाराज यांच्या किर्तन व गायक कार्यक्रम , दुपारी ३ वाजता दहिकाला व सायंकाळी ४ वाजता पासुन भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
या सर्व कार्यक्रमाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहनजय शिव भोले पंच कमेटी व समस्त गावकऱ्यांनी केले आहे .


0 टिप्पण्या