माळशेज घाट रस्त्यावर दुचाकीवरून पडून एक ठार एक महीला गंभीर
मुरबाड:- कल्याण नगर माळशेज घाट रस्त्यावर दुचाकीवरून पडून एक जण जागीच ठार तर महीला गंभीर झालेची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे.
मुंबई वरून पुणे जिल्ह्यातील मंचर मुक्तार सय्यद वय 38 आणि त्यांची पत्नी हिना सय्यद वय 37 हे जात असताना माळशेज घाटातीलम वैशाखरे वळणावर दुचाकीचा ब्रेक न लागल्याने हा अपघात झाला असून यात मुक्तार सय्यद हा जागीच ठार झाला तर त्यांची पत्नी हिना सय्यद ही गंभीर रित्या जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी जुन्नर येथे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास टोकावडे पोलीस करत आहेत.
प्रतिनिधी: राजेश भांगे, मुरबाड-ठाणे
0 टिप्पण्या