कन्हान येथे होणाऱ्या कृषि प्रदर्शनी स्थळाचे भुमीपुजन कार्यक्रम संपन्न
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरात भव्य कृषि प्रदर्शन गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी ते रविवार दिनांक १९ फेब्रुवारी पर्यंत होणार असून या मध्ये भव्य कृषी प्रदर्शनी कुस्ती चे आमदंगल , महिला उद्योजक मेळावा व महिला कब्बडी स्पर्धा , लावणी कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून त्याचे सोमवार ला मान्यवरांचा हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले.
या कृषी प्रदर्शनी मध्ये महत्वाचे म्हणजे कुस्ती स्पर्धा , पशु पक्षी प्रदर्शनी , महिला उद्योजक मेळावा , कृषि प्रदर्शन मार्फ़त शेतकऱ्यांना , महिलांना व युवकांना रोजगार व्हावा व शेती व आधुनिक युगा बद्दल माहिती व्हावी ह्या करीता हे आयोजन करण्यात आले आहे . सोमवार दिनांक १३ फेब्रुवारी ला कृषि प्रदर्शनी स्थळाचे भुमीपुजन जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ.रश्मीताई बर्वे आणि कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी कन्हान – पिपरी नगरपरिषद उपाध्यक्ष मा.योगेंद्र रंगारी , लक्ष्मण बाबू मेहर , सौ. अंजना चकोले , सौ.विद्या सत्येकार , कमल (लालू) यादव , आकिब सिद्दीकी , रिंकेश चवरे , हीरा चकोले , रामाजी चकोले , राजू गुळधे , रमेश सहारे , इंदल यादव , गिरधर राऊत , मंगेश अमृते , सावित्री ठाकरे , शिल्पा ठाकरे , सुनंदा चरदे , अर्चना जामदार , रेणुका आकरे , वैष्णवी जामदार , रीता मस्के , वैशाली खोब्रागडे , अंजना चकोले , किरण जगनेकर , अरुण जगनेकर , ऋषिकेश सहारे , देवाशीष सत्येकार सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आयोजक मा.संजय सत्येकार यांनी आभार व्यक्त केले .


0 टिप्पण्या