प्लास्टिक चा वापर करणाऱ्या १०० पेक्षा जास्त दुकानावर धाड
नप प्लास्टिक बंदी पथक ची कारवाई, ९ किलो २९६ ग्राम प्लास्टिक जप्त
कन्हान प्रतिनिधि-ॠषभ बावनकर
कन्हान : कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासनाच्या प्लास्टिक पिशवी बंदी पथका ने प्लास्टिक पिशवी चा वापर करणाऱ्या १०० पेक्षा जास्त दुकानावर धाड. प्लास्टिक रोधक पथकाने धाड मारुण, ९ किलो २९६ ग्राम एकल वापर प्लास्टिक पिशवी जमा करण्यात आली. प्लास्टिक पिशवी जमा झाल्याची माहिती प्लास्टिक बंदी पथक प्रमुख, स्वच्छता व पाणी पुरवठा अभियंता फिरोज बिसेन यांनी दिली.
केंद्र सरकार ने १ जुलै पासून काही एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंवर संपूर्ण बंदी लागू करण्याचे जाहीर केले. परंतु कन्हान नगर परिषद क्षेत्रात शासनाच्या आदेशांचे नगर परिषद प्रशासन द्वारे कुठलेही पालन न करता मोठ्या प्रमाणात प्लास्टिक चा उपयोग केला जात आहे.
याच पार्श्वभूमी वर शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नप प्लाॅस्टिक बंदी पथका द्वारे व्यावसायिक क्षेत्रात प्लास्टिक बंदी ची कार्यवाही करण्यात आली . नप प्लास्टिक बंदी पथक द्वारे जवळपास १०० च्या वर दुकानाची तपासणी करण्यात आली. या कार्यवाही दरम्यान ९ किलो २९६ ग्राम एकल वापर प्लास्टिक जमा करण्यात आला व व्यापारी वर्गांना एकल प्लास्टिक पुनःवापर केल्यास कार्यवाही करण्यात येईल याची ताकीद देण्यात आली.
सदर कार्यवाही दरम्यान प्लाॅस्टिक बंदी पथक प्रमुख , स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता फिरोज बिसेन , शहर समन्वयक आशिष गुंडूकवार, लिपिक राजेश राणा, नप कर्मचारी नेहाल बढेल, उमेश कठाणे आदि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी दुकानदार बांधवांना आणि नागरिकांना शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आव्हाहन नगर परिषद प्रशासना ने केले आहे.


0 टिप्पण्या