Advertisement

कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे रक्तदान आणि आरोग्य शिबीर कार्यक्रम संपन्न

कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे रक्तदान आणि आरोग्य शिबीर कार्यक्रम संपन्न

एकुण ५०२ नागरिकांच्या आरोग्या ची केली तपासणी , १८ रक्तदात्यांनी केले रक्तदान

कन्हान – कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे रक्तदान आणि आरोग्य शिबीर कार्यक्रमात एकुण ५०० नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली व १८ रक्तदात्यांनी रक्तदान करुन शिबीर कार्यक्रम संपन्न करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांचा आदेशानुसार कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे गुरुवार दिनांक ९ फेब्रुवारी ला सकाळी ९३० ते सायंकाळी ४३० वाजता पर्यंत भव्य महारक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीत कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रश्मी बर्वे , जिल्हा परिषद सदस्य मा.व्यकंटेश कारेमोरे , कांद्री ग्रामपंचायत माजी सरपंच मा.बलवंत पडोळे , टेकाडी ग्रामपंचायत सदस्य आणि पत्रकार मा.सतीश घारड , कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रा चे वैद्यकीय अधिकारी मा.डॉ शशांक राठोड आदि मान्यवरांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दीप प्रज्वलन करुन शिबीर कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली .

या आरोग्य तपासणी शिबीरात कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रा चे वैद्यकीय अधिकारी डॉ शशांक राठोड , डॉ तेजस्वीनी गोतमारे , आरोग्य सहायक सज्जनदास थुल , हंसराज ढोके , माया हार्डे यांच्या सहकार्याने एकुण ५०२ नागरिकांच्या बीपी , शुगर , नेत्राची तपासणी , कैंसर , दमा , अस्थमा , सह आदि विविध बीमाऱ्यांची तपासणी करण्यात आली तसेच आंगणवाडी व  शालेय विद्यार्थांचा आरोग्याची तपासणी करण्यात आली .

तसेच रक्तदान शिबीरात डागा रुग्णालय रक्तपेढीचे इंचार्ज डॉ पांडे सर , डॉ पारवेकर मॅडम सह आदि स्टाॅप च्या सहकार्या ने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रश्मी बर्वे , कांद्री ग्रामपंचायत माजी सरपंच मा.बलवंत पडोळे , टेकाडी ग्रामपंचायत सदस्य आणि पत्रकार मा.सतीश घारड , प्राथमिक आरोग्य केंन्द्रा चे

श्रावण इंगळे , हरिदास पराते , नितेश तांदुळकर , प्रल्हाद कुंभरे ,   पंकज पोजगे यांच्या सह एकुण १८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोहार वितरित करुन शिबीर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

या प्रसंगी कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रा चे अधिकारी , कर्मचारी , नर्स , आशा वर्कर सह विविध संघटने चे पदाधिकार्यांनी उपस्थित राहुन सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वि संपन्न करण्यात आले .

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या