Advertisement

कन्हान नदी नवनिर्मित पुलावर पुन्हा गड्डे , सळाखी बाहेर आल्याने मोठ्या अपघाताची शक्यता

कन्हान नदी नवनिर्मित पुलावर पुन्हा गड्डे , सळाखी बाहेर आल्याने मोठ्या अपघाताची शक्यता

शासन , प्रशासन , अधिकारी झोपेत , कधी होणार कामाची चौकशी

नागरिकांना होतोय त्रास , जनतेच्या पैश्याची लुट शासन , प्रशासनाने तात्काळ थांबवण्याची गरज – नागरिक

कन्हान – कन्हान नदी नवनिर्मित पुलाचे उद्घाटन होऊन फक्त सहा महिन्यातच दोन ते तीन वेळा मोठ मोठे गड्डे पडुन सळाखी दिसु लागले . या संबंधित पुढाकार 24 तास समाचार न्युज मध्ये बातमी प्रकाशित होताच गड्डे बुझवुन फक्त लीपापोती केली . आता पुन्हा गड्डे पडुन सळाखी दिसु लागल्याने मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली असुन पुलाच्या बांधकामा वर आता प्रश्न निर्माण झाले आणि स्थानिक जनप्रतिनिधि , शासन , प्रशासन , अधिकारी , कुठे गहाळ झाले व या पुलाच्या बांधकामाची चौकशी कधी होणार अश्या चर्चेला उधाण आले आहे.

कन्हान नदी नवनिर्मित पुलाचे भुमिपुजन २०१४ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री मा.आॅक्सर फर्नांडिस यांच्या हस्ते आणि तत्कालीन खासदार मुकुल वासनिक यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले होते . पुल तीन वर्षात पुर्ण होण्याचे आश्वस्त केल्यानंतर मध्यंतरी घडलेल्या राजकीय घडामोळी मुळे पुलाचे कार्य संधगतीने सुरु होते .या पुलाचे बांधकाम ताराकुंड कंपनी द्वारे करण्यात आले .

पुलाच्या बांधकामा ला जवळपास आठ वर्ष लागली . १ सप्टेंबर २०२२ ला केंद्रीय मंत्री मा.नितिन गडकरी यांच्या हस्ते , विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे , खासदार मा.कृपाल तुमाने , आमदार मा.आशिष जयस्वाल , माजी आमदार मां. मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नवनिर्मित पुलाचे उद्घाटन करण्यात आले . तेव्हा पासुन पुलावर दोन ते तीन वेळा मोठ मोठे गड्डे पडुन सळाखी दिसु लागले आहे .

सदर समस्या ला गंभीर्याने घेत कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी व सदस्यांनी विधान परिषद मा.आमदार चंद्रशेखर बावनकुळे , रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल आणि संबंधित अधिकार्यां मार्फत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन पाठुन पुलाच्या बांधकामाची चौकशी करुन दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई ची मागणी केली होती . तरी सुद्धा नितिन गडकरी , चंद्रशेखर बावनकुळे , आशिष जयस्वाल आणि संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी सदर विषयाला केळाची टोपली दाखविली . परंतु आता पुन्हा गड्डे पडुन सळाखी दिसु लागल्याने शासन , प्रशासन , अधिकारी आणि जनप्रतिनिधि पुलावर मोठ्या  अपघाताची वाट पाहत आहे काय अशी चर्चा नागरिकांन मध्ये सुरु आहे .

नागरिकांना होतोय त्रास , जनतेच्या पैश्याची लुट शासन , प्रशासनाने तात्काळ थांबवण्याची गरज – नागरिक

कन्हान नदी वरील नवनिर्मित पुलाचे उद्घाटन झाल्या नंतर दिवस रात्र वाहनांची धावपड सुरु झाली . दोन ते तीन वेळा पुला वर गड्डे पडुन सळाखी बाहेर आल्याने वाहन चालकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे . या गड्या मुळे निर्दोष वाहन चालक रोडा वर पडुन गंभीर जख्मी होऊन अपंगत्व झाले . इतकेच नव्हे तर पुढाकार 24 तास समाचार न्युज मध्ये बातमी प्रकाशित होताच गड्डे बुझवुन फक्त लीपापोती करण्यात आली .

आता पुन्हा गड्डे पडुन सळाखी बाहेर आल्याने मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे . केव्हा पर्यंत गड्डे पडुन निर्दोष लोक जख्मी होतील असा प्रश्न आता नागरिकांच्या चर्चेतुन समोर येत आहे . केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कन्हान पुलाच्या बांधकामाची सखोल चौकशी करुन जनतेच्या पैश्याचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे .

रुषभ बावनकर कन्हान नागपुर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या