कांद्री येथे दोन दिवसीय विविध कार्यक्रमाने संत गजानन महाराज प्रकट दिवस महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
कन्हान – परिसरातील कांद्री येथे स्वर्ग श्री सोमाजी गिऱ्हे यांच्या शेतातील श्री संत गजानन महाराज मंदिरात दोन दिवसीय विविध कार्यक्रमाने गजानन महाराज प्रकट दिवस महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
रविवार दिनांक १२ फेब्रुवारी ला सायंकाळी वार्ड क्रमांक तीन लहान हनुमान मंदिरात विधिवत पूजा पाठ आरती करुन पालखी यात्रा काढण्यात आली . यावेळी विविध ठिकठिकाणी महिलांनी , भाविकांनी , पुजा पाठ करुन , फुलाच्या वर्षाने , अल्पोहार वितरित करुन पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले . पालखी विविध मार्गाने भ्रमण करुन पालखीचे स्वर्ग श्री सोमाजी गिऱ्हे यांच्या शेतातील श्री संत गजानन महाराज मंदिरात पुजा पाठ करुन समापन करण्यात आले .
दुसऱ्या दिवशी सोमवार दिनांक १३ फेब्रुवारी ला श्री संत गजानन महाराज मंदिरात सकाळी भाविकांनी पुजा पाठ करुन श्री संत गजानन भजन मंडळ द्वारे भजन कीर्तन कार्यक्रम करण्यात आले . दुपारी गोपालकाला आणि दहीहंडी चा कार्यक्रम करण्यात आला .
त्यानंतर सायंकाळी महाप्रसाद वितरण करुन गजानन महाराज प्रकट दिवस मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला . यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन सहकार्य केले.
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या